
Dehu Road News
Sakal
देहू : देहू ते आळंदी मार्गावरील विठ्ठलवाडीपर्यंत रस्ता रुंदीकरणासाठी सुमारे ८० टक्के भूसंपादन झाले आहे. उर्वरित २० टक्के प्रक्रिया रखडली होती. त्यातील काही शेतकऱ्यांनी जमीन देण्यास सहमती दर्शविली आहे. त्यासाठी दिवाळीपर्यंत या भूसंपादनाच्या मोबदल्याचे पैसे मिळावेत, अशी मागणी विठ्ठलवाडी येथील बाधितांनी केली आहे. याबाबत त्यांनी हवेलीचे प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांची देहू नगर पंचायत कार्यालयात भेट घेतली.