esakal | चिंचवडमध्ये उभारणार विज्ञान अविष्कार नगरी
sakal

बोलून बातमी शोधा

Science Park

चिंचवडमध्ये उभारणार विज्ञान अविष्कार नगरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - चिंचवड (Chinchwad) स्टेशन येथील सायन्स पार्क (Science Park) परिसरात भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी (Discovery city) उभारण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या (Mantrimandal) बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, भविष्यातील वैज्ञानिक घडविणे यासाठी चिंचवड स्टेशनलगतच्या सात एकर क्षेत्रफळावर जागतिक दर्जाची, विज्ञानातील विविध संकल्पनांवर आधारित भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी पुढील पाच वर्षात उभारण्यात येईल. केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत यासाठी १९१ कोटीच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

हेही वाचा: महापालिका प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांची रायगडला बदली

एकविसाव्या शतकातील भारत घडविण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाची गरज ओळखून भारताला समृद्ध बनविण्याचे स्वप्न पूर्ण करणे, हे परिवर्तन करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, या अनुषंगिक जिज्ञासा निर्माण करणे, तंत्रज्ञानाचा सामाजिक विकासासाठी उपयोग करणे, आनंददायी पद्धतीने विज्ञान शिकवणे, अनुभवात्मक शिक्षण, विज्ञानावर आधारित विविध संकल्पनांचे सादरीकरण, प्रदर्शन आदी बाबी विचारात घेऊन त्याची माहिती आणि ज्ञान विद्यार्थ्यांना देण्याची व्यवस्था विज्ञान अविष्कार नगरीत असेल.

सायन्स पार्कचे संचालक प्रविण तुपे म्हणाले, 'आताच्या सायन्स पार्क शेजारील जागेत विज्ञान अविष्कार नगरी उभारण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरासाठी ही गौरवाची बाब आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरची विज्ञान नगरी असेल.'

loading image
go to top