धक्कादायक! आता कोरोना थेट पिंपरी महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात

टीम ई सकाळ
मंगळवार, 30 जून 2020

- महापालिका आयुक्तांच्या बंगल्यावरील सुरक्षारक्षक पॉझिटीव्ह, आयुक्त क्‍वारंटाइन 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या बंगल्यावरील सुरक्षारक्षकाला कोरोना संसर्ग झाला आहे. त्यामुळे आयुक्त होम क्वारंटाइन झाले, असून घरातूनच त्यांचे काम सुरू आहे. त्यांच्या घशातील द्रवाचे नमुनेही आज तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. मात्र, रात्री साडेआठ वाजेनंतर त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे सूत्रांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा अविष्कार हा सरकारी बंगला पिंपरी-चिखली रस्त्यावर मोरवाडी ते केएसबी चौकादरम्यान आहे. बंगल्याच्या प्रवेशद्वारावर महापालिकेतर्फे सुरक्षारक्षक तैनात आहेत. त्यातील एका सुरक्षा रक्षकाचे रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आयुक्त स्वतः होम क्वारंटाइन झाले असून बंगल्यातूनच त्यांनी कामकाज सुरू केले आहे. दरम्यान, सुरक्षा रक्षकाच्या वडिलांना संसर्ग झालेला आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षकाचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. तेही पॉझिटिव्ह आले असल्याचे एका अधिकाऱ्यांनी सांगितले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, महापालिकेचे अतिरिक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही कोरोना संसर्ग झाला होता. आज सात दिवसांच्या उपचारानंतर त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांनी धन्यवाद व्यक्त केले. तसेच, एका सहायक आयुक्ताचा वाहनचालकही पॉझिटीव्ह आढळलेला आहे. त्यामुळे सहायक आयुक्तही क्वारंटाइन झाले आहेत. 

अन्य अधिकारी, कर्मचाऱ्याही बाधित 

महापालिकेतील एक उपअभियंता, एक कनिष्ठ अभियंता, दोन वॉर्डबॉय, सफाई कर्मचारी, विविध विभातील अन्य कर्मचाऱ्यांसह सुमारे 25 जणांना यापूर्वी कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काळजी घेऊनही संसर्ग... 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका भवन व अन्य विभागीय कार्यालयांमध्ये सामान्य नागरिक व ठेकेदारांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. प्रत्येक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर थर्मलगनद्वारे कर्मचारी, अधिकाऱ्यांची तपासणी केली जात आहे. प्रवेशद्वारांसह प्रत्येक दालनात सॅनिटायझरची व्यवस्था केलेली आहे. मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. स्वच्छतागृहातील नळांना हात लागू नये, यासाठी सेंसर असलेले नळ बसविण्यात आले आहेत. तरीसुद्धा अधिकारी, कर्मचाऱ्यांना संसर्ग होत असल्याचे आढळून आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Security guard Corona Positive at Pimpri-Chinchwad Municipal Commissioner's bungalow