esakal | पुणेकरांनो.. पहा आपली सावली कशी शून्य दिसते
sakal

बोलून बातमी शोधा

Zero-Shadow

खगोल विश्वात घडणाऱ्या एका अनोख्या पण विलक्षण घटनेचा आनंद लुटण्यासाठी पहा एक दिवस आपलीच सावली आपली पाठ सोडत आहे. ते ही क्षण सर्वजण  कॅमेऱ्यात कैद करून ठेऊ शकता.

पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये 13 मे ला बरोबर दुपारी 12.31 मिनिटांनी आपल्याला आपली  सावली दिसणार नाही. म्हणजेच आपली सावली सुद्धा त्या क्षणाला आपली पाठ सोडणार आहे.

पुणेकरांनो.. पहा आपली सावली कशी शून्य दिसते

sakal_logo
By
सुवर्णा नवले

पिंपरी - खगोल विश्वात घडणाऱ्या एका अनोख्या पण विलक्षण घटनेचा आनंद लुटण्यासाठी पहा एक दिवस आपलीच सावली आपली पाठ सोडत आहे. ते ही क्षण सर्वजण  कॅमेऱ्यात कैद करून ठेऊ शकता.

पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये 13 मे ला बरोबर दुपारी 12.31 मिनिटांनी आपल्याला आपली  सावली दिसणार नाही. म्हणजेच आपली सावली सुद्धा त्या क्षणाला आपली पाठ सोडणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

या भागातही अशी झाली सावली गायब -
9 मे चिपळूण : 12.32
10 मे सातारा : 12.41
11 मे फलटण : 12.39
12 मे बारामती : 12.28
13 मे पुणे : 12.31
14 मे अलिबाग : 12.35

विद्यार्थ्यांनो करा प्रयोग - 
ह्या विलक्षण घटनेचे साक्षीदार होण्यासाठी विद्यार्थीही हा सायन्स प्रयोग घरबसल्या करू शकतात. ते ही सावलीचे फोटो सोशल मीडियावर एकमेकांना शेअर करून शिक्षकांना पाठवू शकता. शिवाय सायन्स पार्कच्या ई-मेल आयडी वरही हे फोटो.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असा आहे शून्य सावली दिवस -
सध्या सूर्य उत्तर दिशेला प्रवास करत आहे. म्हणून त्याला उत्तरायण म्हणतात. 21 जून रोजी सर्वात मोठा दिवस असतो. त्यानंतर दक्षिणायन म्हणजे सूर्याचा दक्षिणेकडे परत प्रवास सुरु होतो. ह्या प्रवासादरम्यान सूर्य अक्षांशांवरून पुढे जात असतो. ह्या प्रवासादरम्यान सूर्य ज्या अक्षांशावर असेल त्या गावात दुपारी सूर्य बरोबर डोक्यावर येतो आणि एका क्षणी आपली सावली आपल्याला दिसत नाही. त्या दिवसाला शून्य सावली दिवस किंवा Zero Shadow Day म्हणतात.

loading image