esakal | गुन्हा दाखल करताना निष्काळजीपणा केल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलंबित 
sakal

बोलून बातमी शोधा

Senior police inspector suspended for negligence in filing charges

रवींद्र जाधव असे निलंबित केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. जाधव हे चिंचवड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक म्हणून कार्यरत होते. दरम्यान मागील आठवड्यात झालेल्या बदल्यांमध्ये त्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. चिंचवड ठाण्यात कार्यरत असताना जाधव यांनी दोन गुन्हे बेजबाबदारपणे दाखल केल्याचे म्हटले आहे.

गुन्हा दाखल करताना निष्काळजीपणा केल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलंबित 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : सकृतदर्शनी पुरावा नसताना गुन्हा दाखल केल्याचा ठपका ठेवत पिंपरी चिंचवड पोलिस दलातील एका वरिष्ठ निरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला आहे.

रवींद्र जाधव असे निलंबित केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. जाधव हे चिंचवड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक म्हणून कार्यरत होते. दरम्यान मागील आठवड्यात झालेल्या बदल्यांमध्ये त्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. चिंचवड ठाण्यात कार्यरत असताना जाधव यांनी दोन गुन्हे बेजबाबदारपणे दाखल केल्याचे म्हटले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

19 ऑक्टोबरला एका विनयभंगाच्या गुन्ह्यात सकृतदर्शनी पुरावा नसताना देखील गुन्हा दाखल करून त्यातील आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली. त्यानंतर त्याच आणखी एका प्रकरणात सरकारी कामात अडथळा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करून नियमबाह्यपणे महिलेला अटक केल्याचे चौकशीत समोर आले आहे.

दरम्यान, या दोन्ही प्रकरणात जाधव यांनी बेशिस्त, बेजबाबदार आणि निष्काळजीपणा गुन्हे दाखल केल्याने त्यांना निलंबित करण्यात आले.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा