टाकव्यातील 'त्या' तरुणाच्या खूनाचा पाच तासांत छडा; असे सापडले आरोपी...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

टाकवे बुद्रुक येथील यश रोहिदास असवले (वय २२) या तरुणाच्या खूनाचा वडगाव पोलिसांनी पाच तासात छडा लावला असून, या प्रकरणी सात जणांना अटक केली आहे.

वडगाव मावळ : टाकवे बुद्रुक येथील यश रोहिदास असवले (वय २२) या तरुणाच्या खूनाचा वडगाव पोलिसांनी पाच तासात छडा लावला असून, या प्रकरणी सात जणांना अटक केली आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ऋतिक बाळू आसवले (वय २०, रा. टाकवे बु.),  अजय बबन जाधव (वय २४, रा. टाकवे बुद्रुक),  अतिश राजु लंके (वय २१, रा. वतननगर, तळेगाव दाभाडे ),  विकास ऊर्फ बापू विष्णू रिठे (वय २३, रा. गुरूदत्त कॉलनी, वराळे रोड, तळेगाव दाभाडे), ऋतिक कांताराम चव्हाण (वय १९, रा. म्हाळसकरवाडा, वडगाव मावळ), अश्विन कैलास चोरगे ( वय २२, रा. घोणशेत ) व निखील भाऊ काजळे (वय २०, रा. म्हाळसकरवाडा, वडगाव मावळ) अशी या प्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत. महेंद्र अरुण असवले यांनी या प्रकरणी फिर्याद दिली.                                  

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा          

पोलिस निरीक्षक निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. 22) रात्री सव्वादहाच्या सुमारास यश हा जेवण झाल्यानंतर त्याच्या दोन मित्रांबरोबर टाकवे ते घोणशेत रस्त्यावर फिरायला गेला होता. त्यावेळी पाठीमागून टाकवे बाजूकडून तीन मोटारसायकलवरून  सात ते आठ जण आले व त्यातील चार जणांनी गाडीवरून उतरून धारदार शस्त्रांनी यशच्या डोक्यावर वार करून त्याचा खून केला व ते फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक निंबाळकर यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेतली.  हल्ल्यात गंभीर  जखमी झालेल्या यशला सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. शनिवारी (ता. 23) सकाळी त्याच्यावर टाकवे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

दरम्यान, पोलिसांनी आरोपींच्या तपासासाठी तीन पथके पाठवली होती. आरोपी वडगाव मावळ येथील डेक्कन हिल्स येथील पाण्याच्या टाकीजवळ लपून बसल्याची माहिती मिळाल्याने पथकाने त्यांना पकडून ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, यश असवले व ऋतिक असवले यांच्यातील जुन्या भांडणाच्या कारणावरून खुनाची घटना घडल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

खूनाचा छडा लावण्यात पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पाटील, सहाय्यक पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक निंबाळकर, उपनिरीक्षक दिलीप देसाई, शिला खोत, विश्वास आंबेकर, कविराज पाटोळे, भाऊसाहेब कर्डीले, गणेश तावरे, मनोज कदम, श्रीशैल कंटोळी, रविंद्र राय,दिलीप सुपे, दीपक  गायकवाड,  प्रविण विरणक यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven arrested in youth murder case takwe budruk