पिंपरी-चिंचवडकरांची चिंता वाढली; आनंदनगरमध्ये आणखी आढळले रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

- कोरोनाचा संसर्ग शहरात वाढत आहे

- दापोडी, रहाटणी, भोसरी धावडेवस्ती सील

पिंपरी Coronavirus : कोरोनाचा संसर्ग शहरात वाढतच असून, गेल्या 24 तासांत 21 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शुक्रवारी (ता. 22) सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 274 झाली होती. चिंचवडच्या आनंदनगर झोपडपट्टीतील आणखी 12 जणांना बाधा झाल्याने येथील रुग्ण संख्या 48 झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिकेच्या वायसीएम व भोसरी रुग्णालयात दाखल रुग्णांचे तपासणी अहवाल शुक्रवारी सायंकाळी आले. त्यात पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण चिंचवड स्टेशन आनंदनगर, चिखली, भोसरी, रहाटणी, काळेवाडी, दापोडी, येरवडा- पुणे येथील रहिवासी आहेत. तसेच, शहराबाहेरील रहिवासी 23 आणि शहरातील 106 अशा 129 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 161 जण बरे झाले आहेत. आज बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या आठ असून ते चऱ्होली, जुनी सांगवी, यमुनानगर निगडी, भोसरी व पुण्यातील नाना पेठ येथील आहेत. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज सील केलेले भाग

दापोडी : बॉम्बे कॉलनी, जामा मशिद, कृष्णाई डेअरी, महादेव मंदिर, विठ्ठल-तरुण मंडळ दापोडी गावठाण. 

चिखली : डेस्टिनेशन मेमोइर सोसायटीची हद्द, फिनो कॉर्नर. 

रहाटणी : शिवराजनगर, गणपती मंदिर, रॉयल ऑरेंज कौंटी सोसायटी, आकाशगंगा फेजू 2, कुणाल मेडिकल, भाग्यश्री स्टेशनरी, श्रीराम सुपर मार्केट, वेलकम किराण स्टोअर्स. 

भोसरी : धावडेवस्ती, गोविंदा सुपरे मार्केट, कृष्णा कृष्णा कार डेकोर, वर्षा सिलेक्‍शन, रिझवान चिकन सेंटर, ज्ञानेश्‍वरी टेलर्स, शुभम मोबाईल शॉपी, भैरवनाथ शाळा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: seven corona positive found at anandnagar chinchwad