तलवारीनं केक कापणं तरुणांना पडलं महागात!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 19 October 2020

तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे तरुणांना चांगलंच महागात पडलं.

पिंपरी : तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे तरुणांना चांगलंच महागात पडलं. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केलाय. हा प्रकार भोसरीतील बालाजीनगर येथे घडला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्वप्निल पोटभरे, महेंद्र सरवदे, सलीम शेख व अभिषेक देवकर (सर्व रा. बालाजीनगर, भोसरी) यांच्यासह त्यांच्या आणखी तीन साथीदारांवर गुन्हा दाखल झालाय. 5 ऑक्‍टोबरला रात्री दहाच्या सुमारास आरोपी बालाजीनगर चौकातील टेल्कोरोडवरील झोपडपट्टीत महेंद्र सरवदे याच्या कार्यालयासमोर आरोपी आले होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरोपी पोटभरे व सरवदे यांनी त्यांच्याकडील तलवारीने वाढदिवसाचा केक कापून त्याचे प्रदर्शन केले. दरम्यान, या दोघांकडे तलवार असल्याचे माहीत असतानाही, इतर आरोपी त्याठिकाणी हजर राहिल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. या आरोपींवर आर्म ऍक्‍टअंतर्गत भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात रविवारी (ता. 18) सायंकाळी गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास सुरू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: seven youths have been charged with cutting a cake with a sword at bosari