Success Story : मावळातील आदिवासी मुलगा बनला 'पीएसआय' 

रामदास वाडेकर
Friday, 12 February 2021

  • यशात आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नीसह अनेकांचा हातभार 

कामशेत (ता. मावळ) : मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाउन पडले. अमरावती विभागात फिजिकल परीक्षा अडकून पडली. ती पूर्ण होण्यासाठी यावर्षीचा जानेवारी उजाडला. दहा फेब्रुवारीला मावळातील तळपेवाडीचा शरद लोहकरे स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन मावळातील एकोणीस आदिवासी गावांतील पहिला आदिवासी तरुण जो स्पर्धा परीक्षा देऊन पोलिस उपनिरीक्षक पदावर रुजू झाला. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शरदचे वडील गिरजू लोहकरे व आई सीताबाई शेतकरी. परंतु शिक्षणाचे महत्त्व उमगलेल्या या दांपत्याने शिक्षणासाठी मुलांना घर सोडायला लावले. शरदने वडेश्वरच्या शासकीय आश्रमशाळेत राहून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. पुढचे अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात सायन्स शाखेत. बारावी उत्तीर्ण झालेल्या शरदला अठराव्या वर्षाची पोलिस खात्यात नोकरी मिळाली. तत्कालीन पोलिस अधीक्षक विश्वास नांगरे पाटील याच्या व्याख्याने प्रभावित होऊन शरदने पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले. तोपर्यंत स्पर्धा परीक्षेबाबत तो अनभिज्ञ होता, असे त्याच म्हणणे आहे. दरम्यानच्या काळात सोमाटणे टोलनाक्‍यावर ट्रॅफिक हवालदाराची नोकरी करीत त्याने वडगाव मावळ येथे राहून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. 

मावळ : वणव्याच्या आगीत होरपळली पठारे

पोलिस भरती पूर्वी खात्यातील भरतीसाठी धावायचे एवढेच त्याला माहीत होते. म्हणून तो तळपेवाडीत गुरे राखताना त्याच्या मागे धावायचा. गोळा फेकसाठी ओढ्यातील दगडगोटे फेकायचा. हेच त्यांच्या सरावाचे साधन होते. कुटुंबातून शिक्षक होण्याचा आग्रह होता. पण त्याकडे काणाडोळा करीत शरद पोलिस झाला. पण पोलिस निरीक्षकांचे स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हते. सात वर्षे पोलिसाची नोकरी केली. नोकरीत बदलीची अनेक ठिकाण पहिली. दरम्यान लग्न झाले पण पोलिस निरीक्षक हे पद काय स्वस्थ बसू देत नव्हते. उर्से टोलनाका येथे ड्युटीला जावे लागायचे. पहाटे तीन वाजता वडगावातील अशोक शहा या अभ्यासिकेमध्ये जाऊन अभ्यास सुरू केला. दिवसभर नोकरी त्यानंतर घरी आल्यावर पुन्हा अभ्यास असा दिनक्रम ठरला. स्पर्धा परीक्षा झाली. फिजिकल रखडली होती, ती झाली आणि त्यात उत्तीर्ण होऊन शरदने यश मिळवले. या यशात त्याचे गुरू आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नीसह अनेकांचा हातभार असल्याचे त्याने सांगितले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कष्ट आणि त्याग डोळ्यापुढे आहे. टॅफिक हवालदार ते पोलिस निरीक्षक हा प्रवास खूप आव्हानात्मक होता. पण अवघड नव्हता.
- शरद लोहकरे, पोलिस निरीक्षक 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad lohkare of talpewadi in maval became police sub inspector success story