सोशल मीडियातून मैत्रीला उजाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

friendship day

सोशल मीडियातून मैत्रीला उजाळा

पिंपरी : मैत्रीचा दिवस कधी नव्हे तो कोरोनामुळे साधेपणाने साजरा झाला. विकेंड लॉकडाउन आल्याने अनेकांचा हिरमोडही झाला. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट असल्याने तरुणाईने केवळ सोशल मीडिया शुभेच्छा संदेशावरच मैत्रीचे (friendship day) रविवारी सेलिब्रेशन केले. परंतु, अनेक दोस्तीच्या दुनियेतील मित्र-मैत्रिणींनी आपल्या भावना व्हिडीओच्या माध्यमातून शेअर करून हटके ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला. (Sharing old memories The greeting started in the morning)

सोशल मीडियावरही (social media) अनेकांनी एकमेकांचे फोटो शेअर केले. दिवसभर डीपी व स्टेट्सला शुभेच्छा झळकत होत्या. अनेक युवक-युवतींनी जुन्या फोटोंच्या आठवणी व्हिडीओच्या माध्यमातून तयार करून एकमेकांना पाठविल्या. काहींनी शालेय जीवनातील फोटो शेअर केले. बऱ्याच ज्येष्ठांनीही आपल्या जुन्या आठवणींना सेवानिवृत्तीनंतरही सोशल मीडियाच्या माध्यमातून उजाळा दिला. कॉलेज व शालेय जीवनातील मित्र-मैत्रिणींनी यानिमित्त एकमेकांसोबत फोन करून गप्पा मारल्या. रविवारी सुटी असल्याने एकमेकांना व्हिडिओ कॉल केले.

सकाळपासूनच शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. बऱ्याच मित्र-मंडळींनी एकमेकांच्या घरी जेवणाचा बेत आखला. काहींनी छोटेखानी बाहेर जाऊन जेवणाचा बेत केला. चिमुकल्यांनीही शालेय मित्र-मैत्रिणींना संदेश पाठवले. एकमेकांना फ्रेंडशिप बॅंड बांधले. सोसायटी व परिसरात राहणाऱ्यांनी एकमेकांना थेट घरी जाऊन भेट घेतली. अनेकांनी नेहमीप्रमाणे एकत्र कट्ट्यावर जमून चेष्टा मस्करी करत एकमेकांना गळा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

घरीच मैत्रीचा दिवस साजरा केला. मित्रांना कॉल केले. जवळच्या मित्रांना भेटून आलो. पण कोरोनामुळे नेहमीसारखा उत्साह राहिला नाही. प्रत्येकजण नोकरी आणि व्यवसायाच्या काळजीने चिंताग्रस्त आहे. काही प्रमाणात अजूनही प्रत्येकावर टांगती तलवार आहे.

- संदीप रासने, पिंपरीगाव

कोरोनानंतर सेलिब्रेशन करणार आहे. आता नियम पाळले तर सही सलामत राहू. दोस्तांना भेटू. पण, इच्छा व भावनांना आवर घालणे गरजेचे आहे. भटकंती टाळायला हवी.

- नीलिमा शिंदे, चिंचवड

Web Title: Sharing Old Memories The Greeting Started In The Morning

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Social MediaPune News
go to top