'त्या' रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याची शिवसेनेकडून होतीये मागणी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 September 2020

कोरोनाबाधित रुग्णांकडून शहरातील खासगी रुग्णालयाकडून भरमसाट बिले देत लूट करीत आहेत, अशा खासगी रुग्णालयावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने बुधवारी (ता. 9) महापालिकेसमोर आंदोलन केले. 

पिंपरी : कोरोनाबाधित रुग्णांकडून शहरातील खासगी रुग्णालयाकडून भरमसाट बिले देत लूट करीत आहेत, अशा खासगी रुग्णालयावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने बुधवारी (ता. 9) महापालिकेसमोर आंदोलन केले. 

लोणावळेकर अडकले दुहेरी कात्रीत; एकीकडे रोजीरोटीचा प्रश्न तर दुसरीकडे...

जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, महिला संघटिका ऊर्मिला काळभोर, अनंत को-हाळे, अनिता तुतारे, सरिता साने, रोमी संधू, ज्ञानेश्‍वर शिंदे, माधव मुळे, हरेश नखाते आदींनी सहभाग घेतला. कोरोनाबाधित रुग्णांचे तपासणी व उपचार हे सरकारी दरपत्रकानुसारच झाले पाहिजेत. यासाठी या रुग्णालयांचे कामकाज अधिक पारदर्शक होणे आवश्‍यक आहे.

चहाची तल्लफ बेततीये जिवावर; चहाच्या टपऱ्यांववरून वाढतोय कोरोनाचा संसर्ग?

या रुग्णांची खासगी रुग्णालयाकडून आर्थिक पिळवणूक होऊ नये, तसेच सर्वसामान्य जनतेला वेळ पडल्यास खासगी रुग्णालयात उपचार परवडले पाहिजेत, या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने कोरोना तपासणी व उपचारांसाठी दर निश्‍चित केले आहेत. शहरातील खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांकडून भरमसाट रकमांची बिले वसूल करण्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. तक्रार आल्यास पालिका प्रशासन संबंधित रुग्णालयाशी संपर्क करून सरकार दरपत्रकानुसार बिले कमी करून त्या रुग्णालयावर कारवाई करीत आहे. कारवाई करण्यात येत असली तरीही शहरातील सर्व खासगी रुग्णालयाकडून कोरोना बाधित रुग्णांची आर्थिक पिळवणूक सुरूच आहे, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena demanded strict action against hospitals