एक ध्यास वेडा बालक शिवराज जाधव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एक ध्यास वेडा बालक शिवराज जाधव

एक ध्यास वेडा बालक शिवराज जाधव

जुनी सांगवी : आजचे माता पिता मुलांची आवडनिवड पाहून त्यांच्या बरोबरीने चालणारी आणि आपल्या मुलांच्या इच्छेकरिता व आनंदा करिता हवे ते कष्ट उपसणारे माता-पिता समाजात पाहायला मिळतात.आपल्या मुलाने फक्त डॉक्टर आणि इंजिनियर व्हावे. अशी इच्छा असलेले माता-पिता पाहायला मिळतात. पण याला अपवाद म्हणजे जुनी सांगवीतील जाधव कुटुंब होय. हे एक असे कुटुंब आहे की जे आपल्या मुलांना हवे तसे पाखरासारखे बागडता यावे म्हणून कष्ट उपसतात. वडील हनुमंत जाधव यांचा हॉटेल व्यवसाय आहे.

आपल्या मुलाने चांगला माणूस म्हणून नाव कमवावे ही मनिषा बाळगत. मुलांचे संगोपन करणारे जाधव कुटूंबीय. या कुटूंबातील शिकणारा शिवभक्त शिवराज हनुमंतराव जाधव जुनी सांगवी येथील शकुंतलाबाई शितोळे शाळेमध्ये इयत्ता आठवी मध्ये शिकत आहे. वयाच्या सातव्या वर्षापासून तो उत्कृष्ट दर्जाचे ताशा वादन करतो. घरामध्ये वादनाची कसलीही पूर्वपरंपरा नसताना त्याला हा छंद गणेशोत्सवातील ढोल पथकाला बघून अगदी लहान वयामधे आपणही वादक व्हावे असे वाटू लागले. त्याने पुण्यातील 'कलावंत' पथकासह अनेक नामवंत ढोल पथकामध्ये आपल्या जादुई वादनाने अनेकांना मंत्रमुग्ध केले. आणि याची पोचपावती म्हणजे त्याचे मराठा शिवराज हे युट्युब चॅनेल आता आज घडीला त्याच्या चॅनलचे सव्वा लाखाच्यावर चाहते आहेत. तो उत्कृषट व्हिडिओ आणि फोटो एडिटिंगही करतो.

बहुआयामी कलागुणांमुळे त्याची पंचक्रोशीत 'बाल शिवबा' अशी ओळख झाली आहे. तो उत्कृष्ट संबळ वाजवतो. तलवारबाजीमध्ये सुद्धा तो निपुण आहे. संबळ आणि माऊथ ऑर्गन वाजवतो. गुरू नसतानाही केवळ तो स्वतः युट्युब वर पाहून या कला त्याने अवगत केलेल्या आहेत.तो उत्कृष्ट पखवाज वादन करतो. आळंदीच्या श्री अविनाश भोगील महाराज यांच्याकडे तो पखवाजाचे सध्या पुढील शिक्षण घेत असून लाठीकाठी व तलवारबाजीचे शिक्षण राकेश शिक्षक यांच्याकडे शिकत आहे.त्याने उत्कृष्ट अभिनयाद्वारे या क्षेत्रातही ठसा उमटवला आहे. याचबरोबर तो शिव व्याख्यान देतो.शिवाजी महाराजांच्या गट कोट व इतिहासातील प्रसंग आपल्या रांगड्या वाणीतून सादर करत मंत्रमुग्ध करतो. त्याचा आवडीचा छंद म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.महाराजांवर विशेष प्रेम असल्याने महाराजांचा इतिहास महाराजांचे गडकोट महाराजांची युद्ध कला याबद्दल त्याला विशेष आवड आहे. शिवराज मूळचा राहणारा कोल्हापूर मधील सेनापती कापसी या गावचा. मराठ्यांचे सरसेनापती नरवीर संताजी घोरपडे यांचे जन्मगाव म्हणजे शिवराज याचे गाव होय.

या इतिहास प्रेमापोटी त्याने डॉ. अमोल कोल्हे यांच्या अभिनयाने गाजलेल्या छावा या व्यावसायिक नाटकांमध्ये बाल शंभू महाराजांची भूमिका केली उत्कृष्ट संवाद फेक अभिनयातील वेगळेपणा यामुळे रवी पटवर्धन व डॉ.अमोल कोल्हे व नाटक वर्तूळातून त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली.यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्यांनी त्याची पाठ थोपटली आहे‌. हे सर्व करत असताना तो आपल्या वडिलांच्या व्यवसायालाही या लहान वयातच हातभार लावतो आहे. मोठ्यापणी चांगला माणूस होऊन आजी,आजोबा आणि आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करत सदैव आनंदी राहायचे हे शिवराजचे ध्येय तर कला,गायन,वादन,अभिनय व शिवव्याख्याता व्हायचे असल्याचे शिवराज जाधव सांगतो. त्याला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

loading image
go to top