दुकानदार आणि जागरूक नागरिकांनी आपल्या परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 December 2020

पोलिसांद्वारे शहरातील महत्त्वाच्या चौकात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.  मात्र चोरांवर अंकुश बसविण्यासाठी आणि नकोशी घटना टाळण्यासाठी दुकानदार आणि जागरूक नागरिकांनी आपल्या परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत असे आवाहन परिमंडल एकचे पोलिस उपायुक्त मंचक इप्पर यांनी केले.

भोसरी - पोलिसांद्वारे शहरातील महत्त्वाच्या चौकात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.  मात्र चोरांवर अंकुश बसविण्यासाठी आणि नकोशी घटना टाळण्यासाठी दुकानदार आणि जागरूक नागरिकांनी आपल्या परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत असे आवाहन परिमंडल एकचे पोलिस उपायुक्त मंचक इप्पर यांनी केले.

भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याअंतर्गत घेण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या सभेत ते बोलत होते. या वेळी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ट पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे, महापालिकेचे स्वीकृत सदस्य संजय वाबळे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, आरपीआय(ए)चे माजी शहराध्यक्ष सुधाकर वारभूवन, गिरीश वाघमारे, लघुउद्योजक विनोद खांबे, शंकर कुऱ्हाडे, गणेश आंबेकर, नितीन बोऱ्हाडे, अमित आल्हाट, संतोष कसबे,  पोलिस हवालदार संतोष रत्नपारखी आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिस उपायुक्त मंचक पुढे म्हणाले, 'कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याअंतर्गत नवीन पोलिस चौक्यांची उभारणी करण्यात येणार आहे. रस्त्यावरील चौकांतील वाहनांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पन्नास ट्रॅफीक वार्डनचीही नियुक्ती करण्यात येणार आहे."

पिंपरी-चिंचवड : शिक्षकांना मिळेना कोरोना प्रोत्साहन भत्ता 

या वेळी स्वीकृत सदस्य वाबळे म्हणाले, 'भोसरी एमआयडीसी परिसरातील लघुउद्योजक कंपन्यांमध्ये होणाऱ्या चोऱ्यांसह दुचाकी, मोबाईल, चैन आदी चोरींवरही आळा बसविला पाहिजे. परिसरात मोक्याच्या ठिकाणी पोलिसांद्वारे सीसीटिव्ही कॅमेरे बसविले पाहिजेत. त्याचप्रमाणे इंद्रायणीनगर पेठ क्रमांक एक, गुरूविहार कॅालनी, जयगणेश साम्राज्य आणि परिसर हा भाग भोसरी पोलिस ठाण्याला जोडला आहे. भौगोलिकदृष्ट्या हा भाग भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याला जवळचा आहे. त्यामुळ पोलिस ठाण्यांची हद्दीची दुरुस्ती करावी. बेवारस वाहनांवरही कारवाई करावी."

पिंपरी-चिंचवडकरांनो महापालिकेनं दिली कल्याणकारी योजनांच्या लाभासाठी मुदतवाढ 

माजी नगरसेवक आल्हाट म्हणाले, 'कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यास पोलिसांनी मोशीतील गावजत्रेस परवानगी द्यावी. त्याचप्रमाणे वाहतुकीला अडथळा ठरणारे फ्लेक्स, होर्डिंग्ज यावरही पोलिसांनी कारवाई करावी."  

वरिष्ट पोलिस निरीक्षक  गवारे यांनी सांगितले, की वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या फ्लेक्सबद्दल वाहन चालक आणि नागरिकांनी पोलिस ठाण्यात तक्रारी केल्यास असे होर्डिंग्ज, फ्लेक्स काढण्यासाठी महापालिकेला कळविण्यात येईल. ग्राम सुरक्षा दल आणि पोलिस मित्र यांच्याद्वारे स्थानिकांची मदत घेऊन रात्रीच्या वेळी सुरू असणाऱ्या गस्तीमध्ये नागरिकांनीही सहकार्य करावे.  

भोसरी एमआयडीसी पोलिस ठाणे - येथे घेण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या सभेत मार्गदर्शन करताना पोलिस उपायुक्त मंचक इप्पर. या वेळी मान्यवर.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shopkeepers conscious citizens install CCTV cameras their area