पिंपरीतील रेल्वे उड्डाणपुलाजवळ दुकानांना आग 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 September 2020

पिंपरीतील रेल्वे उड्डाणपुलाजवळील दुकानांना लागलेल्या आगीत पाच दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

पिंपरी : पिंपरीतील रेल्वे उड्डाणपुलाजवळील दुकानांना लागलेल्या आगीत पाच दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच, तीन शेळ्या भाजल्या. ही घटना मंगळवारी (ता. 29) पहाटे अडीचच्या सुमारास घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

येथील पुलाखाली विविध वस्तू विक्रींची दुकाने आहेत. गाळा क्रमांक 7, 8, 9, 10 व 11 क्रमांकाच्या गाळ्यांना मंगळवारी पहाटे अचानक आग लागली. यामध्ये गॅरेजसह कपडे शिवण्याच्या दुकानांचा समावेश आहे. या आगीत तीन शेळ्यांसह दोन दुचाकी, कोरोना कीट बनविण्याचे कापड, गॅरेजमधील वस्तू, आठ शिलाई मशीन आदी साहित्य जळाले.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

याबाबत अग्निशामक दलाला माहिती मिळताच दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. एका तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्‍यात आणण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. आग नेमकी कशामुळे हे समजू शकले नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shops fire near railway flyover in pimpri