
पिंपरी : कोरोना महामारीमुळे यंदा श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा होणार आहे. एक ते चार जानेवारी या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवात केवळ धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. समाधी सोहळ्याचे 459 वे वर्ष आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळाचे अध्यक्ष अशोकराव गोडसे यांना 'श्री मोरया गोसावी जीवन गौरव' पुरस्कार जाहीर झाला आहे. चिंचवड देवस्थान ट्रस्ट, महापालिका आणि ग्रामस्थांच्या वतीने हा महोत्सव घेतला जात आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
याबाबतची माहिती ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार जगन्नाथ महाराज देव यांनी दिली. जगभरासह महाराष्ट्रात कोरोना असल्याने यंदा महोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय विश्वस्तांनी घेतला आहे. दरवर्षी दहा दिवस महोत्सव असतो. सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यान, उद्घाटन सोहळा होणार नाही. समाधी मंदिर आवारात मर्यादित लोकांमध्ये सर्व धार्मिक कार्यक्रम होतील.
कार्यक्रम असे :
शुक्रवार
- सकाळी 6 : चंद्रशेखर रबडे गुरुजी यांच्या हस्ते महापूजा
- सकाळी 8 : वीस साधकांच्या उपस्थितीत चरित्र पठण
- सायंकाळी 5 : ज्ञानेश्वर मुरलीधर कपलाने महाराज यांचे कीर्तन.
शनिवार
- सकाळी 9 : रक्तदान शिबिर
- सकाळी 11 : नेत्र चिकित्सा शिबिर व अल्प दरात चष्मे वाटप
रविवार
- सायंकाळी 5 : श्री मोरया गोसावी जीवन गौरव पुरस्कार वितरण
सोमवार
- पहाटे 4.30 : श्री मोरया गोसावी संजीवन समाधीची महापूजा
- सकाळी 8 : मोरया गोसावी चरित्र पठण. महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे पुणे जिल्हाध्यक्ष सतीश महाराज काळजे यांचे काल्याचे कीर्तन
- रात्री 10 : समाधी मंदिर आणि मंगलमूर्ती वाड्यात धूप आरती
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
महाप्रसाद नाही
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाप्रसादाचे वाटप या वर्षी होणार नाही. या कालावधीत मंदिर परिसरात संचार बंदी व जमाव बंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करून महोत्सव पार पडणार आहे. भाविकांनी नियम पाळून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंदार देव महाराज, विश्राम देव, आनंद तांबे, ऍड. राजेंद्र उमाप, विनोद पवार यांनी केले आहे.