मेडिकल वेस्ट टाकणाऱ्या मोशी रस्त्यावरील 'या' हॉस्पिटलला आरोग्य विभागाचा दणका

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 23 August 2020

चिखली-मोशी रस्त्यावर मेडिकल वेस्ट टाकणाऱ्या सिद्धीविनायक हॉस्पिटलवर 25 हजार रुपये दंडाची कारवाई क क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या पथकाने शनिवारी (ता. 22) केली.

पिंपरी : चिखली-मोशी रस्त्यावर मेडिकल वेस्ट टाकणाऱ्या सिद्धीविनायक हॉस्पिटलवर 25 हजार रुपये दंडाची कारवाई क क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या पथकाने शनिवारी (ता. 22) केली. सहाय्यक आयुक्त व क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक आरोग्य अधिकारी बी. बी. कांबळे, आरोग्य निरीक्षक विजय दवाळे व वैभव कांचनगौडार यांच्या पथकाने ही कारवांई केली. 

ऐन गणेशोत्सवात वीज होतेय गायब; दिघी, भोसरीत नागरिक हैराण 

चिखलीतील कुदळवाडीत असणाऱ्या कचराकुंडीत दवाखान्यात वापरलेले इंजेक्शन व वैद्यकीय घातक कचरा टाकण्यात आल्याचे आढळून आले. त्यामध्ये असणाऱ्या कागदपत्रांच्या आधारे हा वैद्यकीय कचरा सिद्धीविनायक रुग्णालयाचा असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. आकुर्डी रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. सुनीता साळवी यांनी प्रत्यक्ष कचराकुंडीत टाकलेल्या कचऱ्याची पाहणी केली.

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यानंतर मोशी रस्त्यावरील या रुग्णालयात जाऊन तपासणी केली. त्यावेळी त्यांच्याकडे महापालिकेकडील वैद्यकीय कचऱ्याची परवानगी नसल्याचे आढळून आले. या रुग्णालयाने रस्त्यावर कचरा टाकल्याने या रुग्णालयाचे प्रमुख डॉ. परीक्षित फेंगडे यांच्यावर 25 हजार रुपये दंडाची कारवाई सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: siddhivinayak hospital fined 25 thousand for dumping medical waste on chikhali-moshi road