esakal | मेट्रो प्रकल्पात भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यासाठी स्वाक्षरी मोहीम | Metro Project
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjog Waghere

मेट्रो प्रकल्पात भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यासाठी स्वाक्षरी मोहीम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जुनी सांगवी - पिंपरी-चिंचवड शहराच्या मेट्रो प्रकल्पात भूमिपुत्रांना नॉन टेक्निकल जागांसाठी प्राधान्य मिळावे. तसेच, आयुक्त राजेश पाटील यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे दररोज येथील परिसरात पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा या दोन गोष्टींची पूर्तता होण्यासाठी फुगेवाडीत स्वाक्षरी मोहीमेचा उपक्रम नुकताच राबविण्यात आला होता. या मोहिमेचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोपान फुगे, सोपान सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले.

या मोहिमेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विद्यमान नगरसेवक राजू बनसोडे, नगरसेविका स्वाती काटे, माजी नगरसेविका उषा वाखारे, सामाजिक कार्यकर्त्या शीला जाधव, यशवंतराव वाखारे, मुकुंद वाखारे, पुरुषोत्तम वाखारे, वैशाली वाखारे, राजेंद्र ढवान, दीपक शिंदे राहुल गायकवाड, अनिकेत डोळस, पंढरीनाथ पेठे, मुनेश फंड, अनिकेत दातार, तनवीर दुधनी, नभी शेख तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील ६७२ नागरिकांनी या स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेत स्वाक्षरी मोहीम राबवली.

loading image
go to top