esakal | पिंपरीत युवक कॉंग्रेसचे भाजप कार्यालयासमोर मूक निदर्शने
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरीत युवक कॉंग्रेसचे भाजप कार्यालयासमोर मूक निदर्शने

फसव्या घोषणांच्या विरोधात चिंचवड विधानसभा युवक कॉंग्रेसच्यावतीने पिंपरी मोरवाडीतील पिंपरी चिंचवड शहर भाजप मध्यवर्ती कार्यालयासमोर शांततेत मूक निदर्शने करून मोदी सरकारचा निषेध आज (ता. 14) करण्यात आला. 

पिंपरीत युवक कॉंग्रेसचे भाजप कार्यालयासमोर मूक निदर्शने

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : कोरोना महामारीच्या काळात रोजगार हिरावले गेले असताना, जनता प्रचंड आर्थिक तणावात आहे. अशात मात्र, केंद्र सरकारने जनतेच्या भावनांशी खेळत आश्‍वासनांची खैरात केली. या फसव्या घोषणांच्या विरोधात चिंचवड विधानसभा युवक कॉंग्रेसच्यावतीने पिंपरी मोरवाडीतील पिंपरी चिंचवड शहर भाजप मध्यवर्ती कार्यालयासमोर शांततेत मूक निदर्शने करून मोदी सरकारचा निषेध आज (ता. 14) करण्यात आला. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्र सरकारचा निषेध म्हणून राज्यभरात महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्यावतीने राज्यभरात आंदोलन करण्यात आले. शहरातील युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन केंद्र सरकारचा निषेध केला. या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस सरचिटणीस मयूर जयस्वाल, सेवादल अध्यक्ष मकरध्वज यादव, शहर युवक कॉंग्रेसचे विशाल कसबे, कुंदन कसबे, चिंचवड विधानसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष संदेश बोर्डे, तुषार पाटील आदींनी सहभाग घेतला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

आंदोलनकर्ते म्हणाले, "कोरोना महामारीच्या काळात निर्माण झालेल्या संकटाचा सामना करण्यासाठी केंद्राकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटीचे पॅकेज जाहीर केले होते. अद्याप या घोषणेची अंमलबजावणी केंद्र सरकारकडून न झाल्याने शेतकरी, महिला, उद्योजक, युवक सर्वच नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे."

loading image