
तळेगाव एमआयडीसी जवळील नवलाख उंबरे (ता. मावळ) ग्रामपंचायत हद्दीत बधलवाडी शिवारात गुरुवारी (ता. 11) दुपारी परदेशी स्थलांतरित सहा ग्रेटर फ्लेमींगो जातीचे पक्षी मृतावस्थेत आढळून आले.
तळेगाव स्टेशन (ता. मावळ) : तळेगाव एमआयडीसी जवळील नवलाख उंबरे (ता. मावळ) ग्रामपंचायत हद्दीत बधलवाडी शिवारात गुरुवारी (ता. 11) दुपारी परदेशी स्थलांतरित सहा ग्रेटर फ्लेमींगो जातीचे पक्षी मृतावस्थेत आढळून आले.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
बधलवाडी येथील शेतकरी गबाजी नाथा दहातोंडे यांच्या शेतामध्ये अतिउच्चदाब वीजवाहिनीच्या तारांचा शॉक लागून या पक्ष्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मावळ वनविभागाच्या अधिकऱ्यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. वन्यजीव कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पहिल्या दिवशी गृहप्रवेश अन् दुसऱ्या दिवशी घर जमीनदोस्त!
पशुसंवर्धन पुणे विभागाचे उपायुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांच्या समक्ष तपासणी करून शवविच्छेदन करण्यात आले. शास्त्रीयदृष्ट्या या पक्ष्यांची पंचासमोर दहन करून विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती मावळचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. झेड. ताकवले यांनी दिली.
- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
शिंपल्यात राहणारे जलचर, कोळंबी, चिंगाटी, सोडे हे मुख्यत्वे फ्लेमिंगोचे खाद्य आहे. मावळात सहसा न दिसणारे आणि परदेशी पाहुणे फ्लेमिंगो पक्षी जाधववाडी जलाशयात खाद्याच्या ओढीने आले असावेत, असा अंदाज तळेगाव दाभाडे येथील पक्षीतज्ज्ञ फ्रेंडस ऑफ नेचर संस्थापक महेश महाजन यांनी व्यक्त केला.