Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये 69 नवीन रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 February 2021

आज शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील एक हजार 822 आणि बाहेरील 767 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 753 जणांना लस देण्यात आली. आजपर्यंत नऊ हजार 509 जणांना लस देण्यात आली आहे.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी 69 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या एक लाख 10 हजार नऊ झाली आहे. आज 147 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 97 हजार 354 झाली आहे. सध्या एक हजार 833 सक्रिय रुग्ण आहेत. 

आज शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील एक हजार 822 आणि बाहेरील 767 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 753 जणांना लस देण्यात आली. आजपर्यंत नऊ हजार 509 जणांना लस देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयांत 603 रुग्ण उपचार घेत आहेत. एक हजार 230 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 

Success Story: नोकरी सांभाळत 'ती' झाली ‘सीए’; एकत्र कुटुंबाची मिळाली साथ!​

कंटेन्मेंट झोनमधील 335 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. त्यातील एक हजार 244 जणांची तपासणी केली. 836 जणांचे आज विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत एक लाख 19 हजार 287 जणांचे विलगीकरण करण्यात आले. 

'भारतरत्नांची चौकशी करणारी रत्न देशात कुठेही सापडणार नाहीत'; देवेंद्र फडणवीस भडकले​

आज 636 संशयित रुग्णालयात दाखल झाले. 495 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. 603 जणांचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत. 714 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 

आजपर्यंत सहा लाख 27 हजार 837 संशयित रुग्णालयात दाखल झाले. पाच लाख 26 हजार 406 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. सहा लाख 23 हजार 722 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

पुणे : दोन तालुके वगळता सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडी ठरल्यानुसारच!​

आज मृत्यू झालेले शहराबाहेरील नागरिक महिला चऱ्होली (वय 64) येथील रहिवासी आहे. आज शहराबाहेरील कोणाचाही मृत्यू झाला नाही.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sixty-nine new Coronavirus patients in Pimpri-Chinchwad