
Ram Mandir Scam: आपल्याकडं पैशांचे किंवा आर्थिक घोटाळे कशात होतील काही सांगता येत नाही. कारण बऱ्याचदा लोकांच्या भावनांचा गैरफायदा घेतही अनेक घोटाळे घडल्याचं आपण पाहिले आहेत. त्यातच आता आणखी एका बड्या घोटाळ्याची भर पडली आहे. अयोध्येतील रामलल्लाच्या प्रतिष्ठापणेचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
पण याच काळात एक मोठा घोटाळा घडला, एका व्यक्तीनं चक्क प्रसादामध्ये करोडो रुपयांचा घोटाळा केल्याचं उघड झालं आहे. अयोध्या पोलिसांनी हा पर्दाफाश केला आहे. जवळपास 10 कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे.