- अमोल शित्रे
पिंपरी - महापालिकेची कारवाई आणि भूखंडाचे वाढते दर याला वैतागून पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक उद्योजक आपले उद्योग शहराबाहेर स्थलांतरित करत आहेत. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी ‘एमआयडीसी’मध्ये औद्योगिक भूखंड शिल्लक नसल्यामुळे उद्योजकांना खासगी भूखंड भाड्याने घेऊन आपले उद्योग सुरू करावे लागत आहेत. कारवाईमुळे आधीच आर्थिक कंबरडे मोडले असताना आणि नवीन जागेचे भाडे परवडणारे नसल्यामुळे बाधित १,२०० पैकी सुमारे ५५ टक्के उद्योजकांनी अजूनही आपले उद्योग सुरू केलेले नाहीत.