

Pimpri-Chinchwad Shines at Smart City Expo World Congress, Barcelona
Sakal
पिंपरी : ‘वेस्ट-टू-एनर्जी’, ‘हरित वाहतूक प्रणाली’ आणि ‘स्मार्ट शहरी उपाय’ या विषयांवर महापालिकेने भूमिका मांडून आपले स्थान अधोरेखित केले. स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ल्ड काँग्रेस अंतर्गत बार्सिलोना येथे आंतरराष्ट्रीय शहरी आणि प्रादेशिक सहकार्य (आययूआरसी) ग्लोबल थीमॅटिक नेटवर्किंग कार्यशाळा झाली. त्यात मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि सहशहर अभियंता बापू गायकवाड यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रतिनिधित्व केले.