esakal | दारूसाठी केला वडिलांचा खून; चिंचवडमधील धक्कादायक घटना
sakal

बोलून बातमी शोधा

दारूसाठी केला वडिलांचा खून; चिंचवडमधील धक्कादायक घटना
  • पोलिस आरोपी मुलाचा  शोध घेत आहेत. 

दारूसाठी केला वडिलांचा खून; चिंचवडमधील धक्कादायक घटना

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मुलानेच वडिलांचा डोक्‍यात तांब्याचा हंडा मारून खून केल्याची घटना चिंचवड येथे घडली. पोलिस आरोपी मुलाचा  शोध घेत आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर पदासाठी भाजपचा उमेदवार ठरला

तानाजी सदबा सोलंकर (वय 52, रा. मोरया हौसिंग सोसायटी, वेताळनगर, चिंचवड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी चंद्रभागा सदबा सोलंकर यांनी फिर्याद दिली. त्यानुसार फिर्यादीचा नातू संजय तानाजी सोलंकर (वय 30) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी (ता. 1) सायंकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादी यांचा नातू संजय हा घरी दारू पिऊन आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आजी व वडिलांकडे दारू पिण्यासाठी पैसे मागू लागला. त्यास पैसे न दिल्याचा राग आल्याने त्याने आजी व वडिलांना शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. दरम्यान, वडिलांच्या डोक्‍यात तांब्याचा हंडा मारल्याने त्यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून अधिक तपास सुरू आहे.