वडगाव-साखळी रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी अत्याधुनिक गतिरोधक    

सकाळ वृत्तसेवा
Friday, 31 July 2020

म्हाळसकरवाडी येथून जाणाऱ्या साखळी रस्स्त्यावर दिवसेंदिवस वाहनांची वर्दळ व रहदारी वाढत आहे.

वडगाव मावळ (पुणे) : म्हाळसकरवाडी येथून जाणाऱ्या वडगाव-पैसाफंड (तळेगाव) साखळी रस्त्यावर भरधाव वाहनांमुळे होणारे अपघात लक्षात घेऊन नगरसेविका सायली रुपेश म्हाळसकर यांच्या पुढाकारातून व नगरपंचायतीच्या विशेष निधीतून अत्याधुनिक गतिरोधक बसविण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

म्हाळसकरवाडी येथून जाणाऱ्या साखळी रस्स्त्यावर दिवसेंदिवस वाहनांची वर्दळ व रहदारी वाढत आहे. भरधाव वेगाने वाहने सुसाट धावू लागली आहेत. त्यामुळे येथे वारंवार छोटे-मोठे अपघात घडत होते. रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या रहिवाशांना व पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे मुश्किल बनले होते. याच भीतीने नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत होत्या. रस्त्याच्या आजू-बाजूच्या नागरी वस्तीचा विचार करून वाहनांची वेग मर्यादा व अपघात रोखण्यासाठी रस्त्यावर गतिरोधक बसविणे हे अत्यंत महत्वाचे व गरजेचे बनले होते. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्थानिक मनसे नगरसेविका सायली रुपेश म्हाळसकर यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन नगरपंचायतीच्या विशेष निधीतून लोकवस्ती व वर्दळीच्या ठिकाणी आधुनिक रबरी गतिरोधक बसविण्याचे काम केले. यामुळे परिसरातील सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त केले. गतिरोधकांमुळे वाहनांच्या गतीला व अपघातांना निश्चित आळा बसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: speedbreaker on vadgaon sakhali road