पिंपरी - भरधाव टेंपो ट्रॅव्हल्सने धडक दिल्याने दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. ही घटना पुणे-नाशिक महामार्गावर वाकी येथे घडली..मंगल वसंतराव गाडे (वय ५४, रा. येलवाडी, ता. खेड) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे पती वसंतराव भिकाजी गाडे यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेंपो चालक व एका अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..फिर्यादी व त्यांच्या पत्नी मंगल गाडे या दुचाकीवरून पुणे-नाशिक महामार्गाने जात होते. दरम्यान, वाकी गावच्या हद्दीत त्यांच्या दुचाकीला एका भरधाव टेंपोने धडक दिली. त्यात मंगल आणि वसंतराव दोघेही रस्त्यावर पडले. वसंतराव यांना दुखापत झाली तर मंगल यांच्या डोक्यावरून चाक गेले. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला..अपघातानंतर मंगल यांना रुग्णवाहिकेतून चाकण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात गेल्यानंतर त्यांच्या गळ्यातील एक लाख २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने गहाळ झाल्याचे समोर आले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.