पिंपरी - अनधिकृत बांधकामात विस्थापित झालेल्या दहावीच्या शिवम कुमार, शिंपूकुमार यादव, पीयूष विश्वकर्मा व आफताब खान या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर छत नव्हते. अभ्यास आणि राहायला जागा नव्हती. अशा बिकट परिस्थितीवर मात करून श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूलचे चारही विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले.