esakal | ...म्हणून परप्रांतीयांसाठी एसटी सेवा कायम राहणार
sakal

बोलून बातमी शोधा

...म्हणून परप्रांतीयांसाठी एसटी सेवा कायम राहणार

- आतापर्यंत सव्वादोन हजार परप्रांतीय गावी परतले 

...म्हणून परप्रांतीयांसाठी एसटी सेवा कायम राहणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शहरातील विविध भागांत कामधंद्यानिमित्त आलेले छत्तीसगड, मध्यप्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश, कर्नाटकातील दोन हजार 205 प्रवासी एसटीमार्फत आतापर्यंत त्यांच्या मूळगावी परतले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत परप्रांतीय मजूरांसाठी बससेवा चालू ठेवली जाणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहर परिसरातील विविध गृहनिर्माण प्रकल्पासहीत इतर कामांसाठी मागील अनेक वर्षांपासून कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, बिहार आदी राज्यांतील परप्रांतीय मजूर स्थायिक झाले होते. लॉकडाउन जाहीर झाल्यामुळे कामे मिळणे बंद होऊन त्यांच्या अडचणीत वाढ झाली होती. अनेक दिवस हे मजूर अडकून पडले होते. मात्र, राज्य सरकारच्या निर्णयानंतर एसटी महामंडळाकडून परप्रांतीय मजूरांना त्यांच्या मूळगावी सोडले जात आहे. लॉकडाउनचा कालावधी 31 मेपर्यंत वाढविण्यात आल्याने एसटी प्रशासनानेही परप्रांतीय मजूरांना दिली जाणारी एसटी सेवा पुढील आदेश येईपर्यंत चालूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

वल्लभनगर एसटी आगार व्यवस्थापक सुनील हिवाळे म्हणाले, "आतापर्यंत आम्ही छत्तीसगड, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आदी राज्यांत दोन हजार 205 परप्रांतीय मजूरांची राज्याच्या सीमेपर्यंत पाठवणी केली आहे. या प्रवाशांसाठी वल्लभनगर आगाराने एकूण 80 गाड्यांची व्यवस्था केली. मंगळवारी (ता. 19) दुपारपर्यंत मध्यप्रदेश येथे तीन आणि कर्नाटकसाठी एक गाडी सोडण्यात आली. प्रत्येक गाडीत जवळपास 25 प्रवासी होते. एसटी प्रशासनाच्या यापूर्वीच्या निर्णयानुसार तिसरा लॉकडाउन संपेपर्यंत म्हणजे 17 मेपर्यंत परप्रांतीय लोकांना एसटीकडून मोफत प्रवास उपलब्ध करून देण्यात येणार होता. मात्र, आता पुढील आदेश येईपर्यंत ही सेवा अशीच सुरू ठेवली जाणार आहे.''