esakal | डॉक्टरवर चाकूने वार; पिंपरीतील घटना, दोघांवर गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

डॉक्टरवर चाकूने वार; पिंपरीतील घटना, दोघांवर गुन्हा

पिंपरीत विरूद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराला बाजूला होण्यास सांगितल्याच्या कारणावरून डॉक्‍टरला शिवीगाळ करीत चाकूने वार केला.

डॉक्टरवर चाकूने वार; पिंपरीतील घटना, दोघांवर गुन्हा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरीत विरूद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराला बाजूला होण्यास सांगितल्याच्या कारणावरून डॉक्‍टरला शिवीगाळ करीत चाकूने वार केला. याप्रकरणी डॉ. प्रवीण रूद्रय्या मठ (रा. श्री राज मॅनोर अपार्टमेंट, यशवंतनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अजय बाळासाहेब पोळ (रा. निवारा हौसिंग सोसायटी, विठ्ठलनगर, पिंपरी) व अप्पा (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गुरूवारी (ता. 15) सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास फिर्यादी हे हॉस्पिटलकडून त्यांच्या दुचाकीवरून जात असताना दुचाकीवरून दोघे जण विरूद्ध दिशेने आले. त्यावेळी फिर्यादीने समोरील दुचाकीचालकाला हाताने इशारा करून बाजूला होण्यास सांगितले असता, दुचाकीचालकाने फिर्यादीला शिवीगाळ केली. तेव्हा शिवी का दिली, असे विचारले असता दुचाकीचालकाने फिर्यादीला हाताने मारहाण केली. तेथील नागरिकांनी भांडण सोडविले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यानंतर फिर्यादी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क करीत असताना भांडण झालेला दुचाकीचालक त्याच्यासोबत आणखी एका व्यक्तीला घेऊन तेथे आला. 'बाहेरून येऊन दादागिरी करतो काय', असे म्हणत आरोपीने फिर्यादीवर चाकूने वार केला. यामध्ये ते जखमी झाले. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.