पिंपरीत भरदिवसा चाकूने वार करून मोबाईल हिसकावला अन्...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 September 2020

चाकूने वार करून पदाचाऱ्याकडील मोबाईल हिसकाविल्याची घटना पिंपरीतील खराळवाडी येथे घडली.

पिंपरी : चाकूने वार करून पदाचाऱ्याकडील मोबाईल हिसकाविल्याची घटना पिंपरीतील खराळवाडी येथे घडली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मोसीन समीर सय्यद (रा. पापय्या चाळ, खराळवाडी, पिंपरी), शुभम अमर नरिया (रा. भागवत गीता मंदिराजवळ, खराळवाडी, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अशोक गोपालराव डहाळे (वय 58, रा. सोना रूपा को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, खराळवाडी) यांनी फिर्याद दिली. शनिवारी (ता.5) सकाळी आठच्या सुमारास फिर्यादी हे खराळवाडी येथील बसथांब्याजवळ असताना आरोपी दुचाकीवरून आले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मोसीन सय्यद याने फिर्यादीच्या हातावर चाकूने वार करून पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. त्यानंतर शुभम नरिया याच्या दुचाकीवरून पसार झाले. यामध्ये फिर्यादीच्या हाताला जखम झाली. वाहन क्रमांक व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: stabbed mobile in pimpri chinchwad crime news