तळेगाव स्टेशन - पुणे जिल्ह्यातील तळेगाव-चाकण-शिक्रापूर एन एच ५४८डी या राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव ते चाकण दरम्यान चार पदरी उन्नत मार्ग व जमिनीस समांतर चार पदरी रस्ता तसेच चाकण ते शिक्रापूर दरम्यान जमिनीस समांतर सहा पदरी रस्ता तयार करण्याच्या निर्णयास मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
त्यामुळे खऱ्या अर्थाने या प्रलंबित आणि बहुचर्चित महामार्गाचे काम सुरु होण्याबाबत शिक्कामोर्तब झाले आहे. या कामाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर मावळ, खेडसह शिरुर तालुक्यातील नागरिकांतून आनंद व्यक्त केला जात आहे.