
पिंपरी : रात्रंदिवस काबाडकष्ट करणाऱ्या कामगारांना राज्य कामगार विमा सोसायटीच्या (ईएसआय) मोहननगर येथील रुग्णालयात मोफत उपचार दिले जातात. गंभीर आणि अतिगंभीर आजारावर कामगारांना उच्च दर्जाचे उपचार घेता यावेत, यासाठी या रुग्णालयात सुसज्ज दहा खाटांचा अतिदक्षता विभाग (आयसीयू) तयार करण्यात आला आहे. मात्र, राज्याच्या आरोग्य विभागाची परवानगी नसल्यामुळे हा विभाग तब्बल एक वर्षांपासून धूळखात पडला आहे.