ड्यूटीवर झोपल्याचे फोटो वरिष्ठांना पाठविल्याने सिक्युरिटी गार्डला आला राग, केले हे भलतेच

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 August 2020

पुणे मेट्रोच्या साइटवर सिक्‍युरिटी गार्ड म्हणून काम करणारा कामगार ड्यूटीवर असतानाच झोपला होता.

पिंपरी : पुणे मेट्रोच्या साइटवर सिक्‍युरिटी गार्ड म्हणून काम करणारा कामगार ड्यूटीवर असतानाच झोपला होता. त्यावेळी स्टोअर असिस्टंटने त्याचे फोटो काढून स्टोअर व्यवस्थापकांना पाठविले. या रागातून सिक्‍युरिटी गार्डने स्टोअर असिस्टंटवर प्राणघातक हल्ला केला. हा प्रकार मारूंजी येथे घडला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चंदन अरविंदकुमार मिश्रा (वय 24, रा. भूमकर चौक, वाकड, मूळ-बिहार) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या स्टोअर असिस्टंटचे नाव आहे. याप्रकरणी सतरा वर्षीय अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. विनोद माधवराव खंडाईत (रा. मारूंजी) यांनी फिर्याद दिली. आरोपी हा मारूंजीतील शिवार वस्ती येथे सुरू असलेल्या पुणे मेट्रोच्या रिच दोन या प्रकल्पाच्या ठिकाणी सिक्‍युरिटी गार्ड म्हणून काम करीत होता. रविवारी (ता. 23) रात्री अकराच्या सुमारास तो ड्यूटीवर असताना झोपी गेला. त्याचे झोपल्याचे फोटो स्टोअर असिस्टंट चंदन मिश्रा यांनी काढून स्टोअर व्यवस्थापकांना पाठविले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या रागातून अल्पवयीन आरोपीने मिश्रा यांना शिवीगाळ करून लोखंडी पाइप व सिमेंटचा ब्लॉक डोक्‍यात मारला. त्यात ते गंभीर जखमी झाले. दरम्यान, फिर्यादी विनोद हे मिश्रा यांना वाचविण्यासाठी गेले असता आरोपीने त्यांनाही मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून अल्पवयीन आरोपी ताब्यात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Store assistant beaten by security guard at marunji