pune mumbai expressway traffic jam
sakal
पिंपरी - टँकर उलटून तब्बल २८ तास होऊनही वाहतूक सुरळीत न झाल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. वाहन चालक, प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांना खाण्यापिण्याची, स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याने प्रचंड गैरसोय झाली. प्रशासनाच्या ‘सौजन्या’ने उपासमार झाल्याची तीव्र प्रतिक्रिया अनेक प्रवाशांनी व्यक्त केली.
अनेक वाहन चालक मंगळवारी मध्यरात्रीचे बारा वाजल्यापासूनच कोंडीत अडकले होते. अनेक जण हतबल होऊन गाडी बंद करून रस्त्यावर बसले होते. एसटी, खासगी ट्रॅव्हल्समधून जाणारे प्रवासी किमान दहा ते बारा तास अडकले होते. महामार्गावर खाद्यपदार्थांची दुकाने किंवा हॉटेल नसल्याने प्रवाशांची उपासमार झाली.