

Stray Cattle Create Traffic Chaos in Pimpri
sakal
पिंपरी : पिंपरी गावातील मोकाट जनावरांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रस्त्यांच्या मध्यभागी बसणारी किंवा फिरणारी ही जनावरे वाहनचालकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत. अनेकदा या जनावरांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होते, तसेच अपघातांच्याही घटना घडत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने तातडीने या जनावरांना निवारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.