Pune Mumbai Expressway
पिंपरी-चिंचवड
Pune Mumbai Expressway : द्रुतगती मार्गावर श्वानांचा उपद्रव; वाहनचालकांच्या सुरक्षेची चिंता
Stray Dogs : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भटक्या श्वानांचा त्रास वाढत असून वाहनचालकांना अपघातांची भीती निर्माण झाली आहे.
सोमाटणे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भटक्या श्वानांचा वावर वाढला आहे. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. शिवाय अपघातांची भीती आहे. द्रुतगती मार्गावर प्राण्यांना येण्यास प्रतिबंध व्हावा, यासाठी किवळे ते कळंबोली मार्गावर ९४ किलोमीटर अंतरावर रस्त्यालगत संरक्षक कुंपण बसवण्यात आले आहेत. त्याची नियमित दुरुस्तीही केली जाते. यामुळे प्राणी मार्गावर येण्यास आळा बसला. पण, मोकाट श्वान अपवाद ठरले आहेत. कुंपणाखालील जागेतून ते द्रुतगती मार्गावर प्रवेश करतात.

