लोणावळ्याच्या लॉकडाउनबाबत आमदार सुनील शेळके यांचे मोठे विधान

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 September 2020

लोणावळा खंडाळा परिसरात सुरक्षाविषयक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करा : आमदार सुनील शेळके 

लोणावळा : लोणावळा- खंडाळा भागातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता सुरक्षाविषयक उपाययोजनांचे कडक पालन होईल याची खबरदारी प्रशासन व पोलिस खात्याबरोबरच सर्व नागरिकांनीही घ्यावी अशा सुचना मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी दिल्या.

बाउन्सरचा 'डोस'; रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये दहशत

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मावळचे आमदार शेळके यांनी खंडाळा चेक पोस्ट येथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. पोलिस प्रशासनाकडुन केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत यावेळी त्यांनी माहिती घेतली. तसेच लोणावळा खंडाळा परिसरातील वाढता संसर्ग रोखण्यासाठी अजून काय उपाययोजना करता येतील याविषयी पोलीस प्रशासन व सोबत चर्चा केली.

पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या लोणावळा- खंडाळा परिसरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. लॉकडाऊनचे नियम शिथील झाल्यानंतर मुंबईसह इतर भागातून लोणावळा, खंडाळा परिसरात नागरिकांच्या येण्याचे प्रमाण वाढले आहे. एकाच गाडीत मर्यादेपेक्षा जास्त नागरिक बसलेले आढळून येत आहेत. या वेळी कोणत्याही प्रकारची सुरक्षा बाळगत नसल्याचे चित्र आहे. अनेक जण मास्क न लावता विनाकारण फिरत असल्याचे आढळून येत नसल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

प्रशासनाच्या वतीने विविध स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी शासनाने दिलेले निर्देश पाळावे. घरात रहावे, सुरक्षित रहावे. प्रशासनाने लावलेले निर्बंध पाळून नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे. प्रत्येकाने आपापल्या परीने या कोरोना संकटाच्या सद्यस्थितीवर मात करण्यासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा आमदार शेळके यांनी व्यक्त केली.

पुण्यात रुग्ण फिरला तीन तास अन् उपचार पिंपरीत 

लोणावळ्यात पुन्हा लॉकडाउन : शेळके तालुक्यात करोनाग्रस्तांचा आकडा वाढतच आहे, मृत्यू दरातही मोठी वाढ होत आहे. दिवसेंदिवस वे रुग्णसंख्या वाढत असून, रुग्णवाढीचे सत्र असेच सुरू राहिल्यास लोणावळ्यात पुन्हा लॉकडाउन करावा लागेल,' असे संकेत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिले आहेत. गेल्या तीन दिवसात राजकीय पदाधिकाऱ्यांसह नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर आमदार शेळके यांनी पत्रकारांशी  संवाद साधला. शेळके म्हणाले,  लॉकडाउनच्या काळात सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केल्याने तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होती. बाजारात नागरिक निष्कारण गर्दी करत आहेत. तालुक्यांत महिनाभरापूर्वी एकही करोनाचा रुग्ण नव्हता तेथे आज कोरोनाचे अनेक रुग्ण आहेत. सर्वांनी अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी प्रत्येकाने मास्कचा वापर करावा. अन्यथा पुन्हा लॉकडाउन करावे लागू शकते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Sagar Diliprao Shelar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Strictly implement security measures in lonavla khandala says mla sunil shelke