जुन्या इमारती, वाड्यांचे स्ट्रक्चरल होणार ऑडिट; राजेश पाटील

पावसाळ्यातील पूरस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका, पोलिस व महावितरणच्या प्रतिनिधींची संयुक्त पूरनियंत्रण आराखडा नियोजन बैठक आयुक्त पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
Rajesh Patil
Rajesh PatilSakal

पिंपरी - ‘सध्याची कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन यावर्षीच्या पूरनियंत्रण व्यवस्थापनाचे नियोजन (Management) करावे. यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयाने जबाबदारी पार पाडा,’ असा आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील (Rajesh Patil) यांनी दिला. शहरातील सर्व जुन्या इमारती (Old Building) व वाड्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट (Structural Audit) करून घेतले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. (Structural audit of old buildings and palaces Rajesh Patil)

पावसाळ्यातील पूरस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका, पोलिस व महावितरणच्या प्रतिनिधींची संयुक्त पूरनियंत्रण आराखडा नियोजन बैठक आयुक्त पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे २०२१ च्या पूरनियंत्रण आराखड्याची माहिती दिली. नदीलगतची पाणी शिरत असलेली ठिकाणे निश्‍चित करून, त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करावा, असा आदेशही आयुक्तांनी दिला.

Rajesh Patil
मुलगा होण्यासाठी विवाहितेसोबत अघोरी प्रकार

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उल्हास जगताप, शहर अभियंता राजन पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, मुख्यलेखापरीक्षक आमोद कुंभोजकर, नगररचना उपसंचालक प्रभाकर नाळे, वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, सहशहर अभियंता रामदास तांबे, मकरंद निकम, प्रवीण लडकत, श्रीकांत सवणे, अशोक भालकर, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, महावितरणचे कार्यकारी अभियंता राहुल गवारे, शिवाजीराव वायफळकर, सहायक पोलिस आयुक्त नंदकिशोर भोसले आदी उपस्थित होते.

आयुक्त म्हणाले...

  • पावसाळ्यात वादळी वाऱ्यासह झाडे उन्मळून मनुष्य व वित्तहानी होऊ नये, यासाठी वृक्षांची छाटणी करून घ्या

  • शहरातील आपत्तीजन्य घटनांची माहिती नियंत्रण कक्षास द्या

  • नदीपात्रालगतच्या झोपडपट्ट्या व इतर धोक्याच्या ठिकाणांचा अभ्यास करून योजना करा

  • नदीपात्रातील अतिक्रमणे काढण्याबाबत कार्यवाही करा

  • नदीपात्रातील गाळ व जलपर्णी काढा, गटार सफाई करा व कीटकनाशक फवारणी

  • धोकादायक जागांचे सर्वेक्षण करून सर्व जुन्या इमारती व वाड्यांची बांधकाम तपासणी पावसाळ्यापूर्वी करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com