esakal | मुलगा होण्यासाठी विवाहितेसोबत अघोरी प्रकार; चहा-नाष्ट्यातून अंगारा खाऊ घातला

बोलून बातमी शोधा

crime

मुलगा होण्यासाठी विवाहितेसोबत अघोरी प्रकार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पिंपरी pimpari chinchwad news- विवाहितेला मुलगा व्हावा यासाठी सासरच्या लोकांनी एका व्यक्तीच्या सांगण्यावरून तिच्या डोक्यावर लिंबू कापणे, चहा, नाष्ट्यात अंगारा टाकून खाऊ घालणे असे अघोरी प्रकार केले. तसेच माहेराहून पंचवीस लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ केला. ही घटना रहाटणी येथे घडली. पती प्रशांत रमेश लोहार (वय ३२), सासू मीना रमेश लोहार (वय ५०), नणंद हर्षदा भूषण मेहता (वय २८, सर्व रा. रहाटणी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ३१ वर्षीय महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Marital abuse to have a boy child pimpari chinchwad news)

हेही वाचा: पिंपरी-चिंचवडमध्ये संसर्ग वाढला; मृत्यूदर घटला

लग्नातील मानपानासाठी माहेरहून २५ लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. पतीने शिवीगाळ करून मारहाण केली. विवाहितेला मुलगा व्हावा यासाठी राम मामा महाराज (रा. रहाटणी) याच्या सांगण्यावरून सासूने विवाहितेच्या डोक्यावर लिंबू कापणे, महाराजांनी दिलेला अंगारा चहा, नाष्ट्यामधून खाऊ घालणे असे अघोरी प्रकार केले. किशोर पंडित (रा. वाघोली) या महाराजाच्या सांगण्यावरूनही विवाहितेशी अघोरी प्रकार केले. तसेच ‘तू मला घटस्फोट दे. नाहीतर तुला व तुझ्या संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकेन’ अशी विवाहितेला धमकी दिली. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.