esakal | Pimpri : दाखल्यांसाठी फरफट विद्यार्थी आणि पालकांची फरफट
sakal

बोलून बातमी शोधा

certificates.jpg

Pimpri : दाखल्यांसाठी विद्यार्थी आणि पालकांची फरफट

sakal_logo
By
आशा साळवी : सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शैक्षणिक वर्षात विविध प्रकारच्या अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या दाखले मिळविण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची फरफट सुरु आहे. अधिकारी वैद्यकीय सुट्टीवर असल्यामुळे रहिवासी दाखले मिळविण्यासाठी अग्निदिव्यच करावे लागत आहे. दाखले देण्यासाठी सरकारी यंत्रणा तोकडी पडत असल्याचे सद्यस्थितीवरून दिसत आहे.

हेही वाचा: लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबरला 'महाराष्ट्र बंद'

पहिली प्रवेशापासून ते व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी लागणारे दाखले मिळविण्यासाठी पालकांची आणि विद्यार्थ्यांची ससेहोलपट आणि आर्थिक पिळवणूक सुरू आहे. सरकारचे सेतू, नागरी सुविधा केंद्र, महा ई सेवा केंद्रात अजूनही अनेक दाखले प्रलंबितच आहेत. प्रवेशात पन्नास टक्के एससी, एसटी, एन. टी, व्ही. जे, एसबीसी या प्रवर्गासाठी आरक्षण आहे. या आरक्षित वर्गातील विद्यार्थ्यांना रहिवासी, उत्पन्न, नॉनक्रिमिलेयर, जात प्रमाणपत्र, डोंगरी दाखला, कास्ट व्हॅलिडीटी, राष्ट्रीयत्व दाखल्यासाठी धावपळ करावी लागत आहे. दुसरीकडे विविध शैक्षणिक प्रवेशासाठी मुदत १० ऑक्टोबर आहे, पण हातात दाखले मिळत नसल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत. पालक अजय कुलकर्णी म्हणाले, ‘‘मेडिकल आणि अभियांत्रिकी प्रवेशासाठी रहिवासी, उत्पन्न आणि अधिवास दाखल्याची अत्यावश्यक आहे. मात्र हे प्रमाणपत्र देण्यासाठी गांभीर्य नाही.’’

सेतू कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी महा-ई सेवा केंद्र सुरू करण्यात आली. मात्र तहसीलदार कार्यालयाच्या तहसीलदार सुट्टीवर आहेत. त्यांच्याजागी नियुक्त अधिकारी अद्याप रुजू झाले नसल्यामुळे दाखले प्रलंबित राहीले आहेत. महा ई सेवा केंद्राकडे दररोज दाखल्यासाठी दोनशे अर्ज दाखल होतात. मात्र महा-ई सेवा केंद्राना महसुली खोडा अनुभवा लागत आहे. चार दिवसांत दाखले देण्याचा नियम असतानाही एका दाखल्यासाठी महिनाभर वेटिंगवर रहावे लागते.

हेही वाचा: Drug case: राष्ट्रवादीने केलेले आरोप NCB ने फेटाळले

संपर्क अभियान थंडावले

सरकारने दोन वर्षापूर्वी घरपोच दाखले देण्यासाठी संपर्क मोहीम राबविली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांना शाळेतच दाखले देण्यात येणार होते. बारावीचा निकाल जाहीर झाला. दहावीचा निकालही लवकरच जाहीर होईल. घरपोच दाखल्याची मोहीम यापूर्वी राबविली असती तर यंत्रणेवरील ताण कमी झाला असता.

‘‘ अधिकारी वैद्यकीय रजेवर आहेत. तरी ७००हून अधिक दाखले वितरित केली आहेत. अनेकवेळा महा-ई सेवा केंद्राकडून अर्ज आमच्याकडे उशिरा येतात. त्यानंतर पालकांकडून घाई केली जाते, तरी आमचा त्वरित दाखले देण्यावर भर असतो. लवकरच रहिवासी दाखले मिळण्यास सुरवात होईल. ’’

-प्रवीण ढमाले, नायब तहसीलदार , पिंपरी चिंचवड तहसीलदार कार्यालय

loading image
go to top