देहू-कॅटोन्मेंट शाळेत गर्दी; विद्यार्थी-पालकांमध्ये गोंधळ

मुकुंद परंडवाल
Monday, 22 February 2021

उद्या (ता.23) पासून शाळा बंद राहतील. तसेच आता शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना तांदूळ वाटप करण्यात येत आहे.त्यामुळे विद्यार्थी शाळेत आहेत. खरे तर देहूरोड कॅटोन्मेंट बोर्ड कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले होते.सध्या कोणताही कोरोनाचा रुग्ण नाही. मात्र शाळा आणि देहूरोड बाजारपेठेत कोरोनासंदर्भात कोणतीच काळजी घेतली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.

देहू :''देहूरोड कॅटोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडून शाळेला बंद ठेवण्याचा आदेश आणि विद्यार्थ्यांना शाळा बंद असल्याच्या सूचना मिळाल्या नाहीत. त्यामुळे सोमवारी (ता.22) शाळेसमोर आणि इतर खासगी शाळेत विद्यार्थ्यांची गर्दी झाली. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना जाब विचारल्यानंतर बोर्ड प्रशासनाने अद्याप आदेश काढला नाही'', असे सांगत शाळांना तोंडीच सूचना देऊन विद्यार्थ्यांना घरी पाठविले.

''देहूरोड कॅटोन्मेंट बोर्डाच्या एम.बी.कॅम्पजवळील महात्मा गांधी प्राथमिक शाळा, तसेच शहरातील दोन खासगी शाळेत सकाळी विद्यार्थी शाळेत आले. काही शाळांनी विद्यार्थी वर्गात बसविले तर काही शाळांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून वर्गात बसविण्यास पाठविले. काही शाळात सहामाही परिक्षा असल्याने विद्यार्थी हजर होते. जिल्ह्यातील संपूर्ण शाळा बंद असताना देहूरोडमधील शाळा सुरु कशा?'', असा प्रश्न पालक आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांना पडला. त्यांनी ताबडतोब शाळेतील मुख्याध्यापकांशी संपर्क साधला.

उर्से टोल नाक्यावर घातला होता धिंगाना; गजानन मारणेच्या 17 साथीदारांना अटक​

याबाबत देहूरोड येथील एम.बी.कॅम्पजवळील महात्मा गांधी शाळेतील मुख्याध्यापक एस. डी. तापकीर यांनी सांगितले, ''बोर्डाची शाळा दुपारी एक वाजता भरते. बोर्ड प्रशासनाकडून शाळा बंद करण्याचे कोणतेच लेखी आदेश आम्हांला आतापर्यत मिळालेले नाहीत. आम्ही आदेशाची वाट पहात आहोत. आदेश नसल्याने आम्ही विद्यार्थ्यांना कळविले नाही. त्यामुळे विद्यार्थी शाळेत येत आहेत. मात्र लवकरच त्यांना घरी पाठवू. याबाबत बोर्डाचे कार्यालयीन अधिक्षक राजन सावंत यांनी सांगितले, बोर्डाचा कारभार सध्या खडकी कॅटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पाहत आहेत.त्यांना आम्ही फॅक्स करून परवानगी घेणार आहोत.

उद्या (ता.23) पासून शाळा बंद राहतील. तसेच आता शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना तांदूळ वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थी शाळेत आहेत. खरे तर देहूरोड कॅटोन्मेंट बोर्ड कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले होते. सध्या कोणताही कोरोनाचा रुग्ण नाही. मात्र शाळा आणि देहूरोड बाजारपेठेत कोरोनासंदर्भात कोणतीच काळजी घेतली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी कॅाग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष रेणू रेड्डी यांनी सांगितले,''बोर्डाची शाळा आणि दोन खासगी शाळेत मी स्वतः गेलो. तेथे विद्यार्थी आलेले होते. शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना सोमवारी शाळा भरे पर्यत कोणत्याच सूचना दिल्या नसल्याचे समजले तर एका शाळेत विद्यार्थी सहामाही परिक्षेसाठी आलेले होते. त्यामुळे बोर्ड प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नये. लवकरात लवकर आदेश काढावा. ''

स्पर्धा परीक्षेसाठी निवडलं एक सेंटर, आलं भलतंच; उमेदवारांमध्ये गोंधळ​ 

  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students gathered in Dehu-Cantonment School due to confusion of order by Government