esakal | पिंपरी: शहरात सोमवारी भरणार शाळा । School
sakal

बोलून बातमी शोधा

school

पिंपरी: शहरात सोमवारी भरणार शाळा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. त्या आता चार ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. त्याआधारे शहरातील आठवी ते बारावीचे वर्ग भरण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर सर्व माध्यमाच्या शाळा व्यवस्थापनासह महापालिकेचीही लगबग सुरू झाली आहे.

शहरात एकूण ३ लाख ५० हजार विद्यार्थी आहेत. त्यापैकी ४९ हजार ९२४ आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या आहे. वर्गखोली तसेच स्टाफ रूममधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतराच्या नियमानुसार असावी. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था शाळांना करावी लागेल.

विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी संमती आवश्यक असेल. शाळा व्यवस्थापन समितीने पालकांशी वरील विषयावर चर्चा करावी. आजारी असलेल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये. विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या संमतीने घरी राहून देखील अभ्यास करता येईल.

अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या मूल्यांकनाकरिता विशिष्ट योजना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांनी तयार करण्यात यावी, असे आदेशात नमूद केले आहे. त्यासाठी शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी चर्चासत्र घेण्यात आले आहे. दरम्यान, १०० टक्के शिक्षकांची उपस्थिती असून सर्वच शिक्षकांनी आरटीपीसीआर चाचणी आणि कोविड लसीकरण होणे अनिवार्य असल्याचे आदेशात म्हटले आहे.

loading image
go to top