esakal | डिजिटल लायब्ररीची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

Digital-Library

कोरोनासारख्या कठीण काळात मुले घरातून शिक्षण घेत आहेत. सध्या मुलांच्या हातात मोबाईल, लॅपटॉप, आयपॅडसारखे महागडे गॅझेट उपलब्ध आहेत. मात्र, या महागड्या गॅझेटमध्ये पुस्तकांची ऑनलाइन गंगाजळी उपलब्ध नाही. सध्या ई-लर्निंगचा जमाना असून, देखील कोणत्याही टॉपच्या शाळा-महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांना ई-लायब्ररी घरबसल्या उपलब्ध झालेल्या नाहीत.

डिजिटल लायब्ररीची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा

sakal_logo
By
सुवर्णा गवारे-नवले

पिंपरी - कोरोनासारख्या कठीण काळात मुले घरातून शिक्षण घेत आहेत. सध्या मुलांच्या हातात मोबाईल, लॅपटॉप, आयपॅडसारखे महागडे गॅझेट उपलब्ध आहेत. मात्र, या महागड्या गॅझेटमध्ये पुस्तकांची ऑनलाइन गंगाजळी उपलब्ध नाही. सध्या ई-लर्निंगचा जमाना असून, देखील कोणत्याही टॉपच्या शाळा-महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांना ई-लायब्ररी घरबसल्या उपलब्ध झालेल्या नाहीत. पुस्तकांचा खजिना असला तरी तो ई-खजिना नसल्याने अद्यापही पुण्याला जोडून असलेल्या पिंपरी-चिंचवड शैक्षणिक माहेरघरात डिजिटल लायब्ररी संकल्पनाच शाळा-महाविद्यालयांपासून कोसो दूर असल्याची वस्तुस्थिती आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरातील सद्यःस्थिती

 • महापालिका तसेच खासगी सहाशेहून अधिक शाळा व महाविद्यालये
 • नामांकित शाळा महाविद्यालयांचे शुल्क डोईजड
 • एकाही शाळेत डिजिटल लायब्ररी संकल्पना नाही
 • मुलांना पुस्तके व साहित्य पीडीएफ स्वरूपात उपलब्ध
 • परिपूर्ण डिजिटल लायब्ररी उपलब्ध नाही

या आहेत अडचणी

 • शाळा व महाविद्यालयांतील ग्रंथालये धूळखात
 • घरबसल्या वाचनासाठी पुस्तके तुटपुंजी
 • प्रत्येक पुस्तक, विद्यार्थ्याला घरी उपलब्ध होऊ शकत नाही
 • ऑनलाइन वाचण्यासाठी शुल्क भरून ॲप उपलब्ध
 • वेबसाइटवरूनही मुलांना पुस्तक खरेदी करणे न परवडणारे
 • मुलांना पुस्तके ऑनलाइनवर क्षणांत उपलब्ध हवीत

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डिजिटल लायब्ररी म्हणजे... 

 • डिजिटल लायब्ररी म्हणजे एक ई पुस्तकालय
 • माहिती हार्ड कॉपी किंवा पुस्तक स्वरूपाऐवजी ऑनलाइन उपलब्ध
 • कायमस्वरूपी हा कंटेंट साठविणे शक्य
 • इंटरनेटवर मॅग्झीन, आर्टिकल्स, पेपर, शाळांचे टेक्सटबुक, जर्नल्स, इमेज, ऑडिओ व व्हिडिओ फाईल्स एका क्लिकवर
 • प्रत्येक संशोधित रिसोर्स मटेरिअल्स देखील तत्काळ उपलब्ध
 • अद्ययावत माहितीचे भांडार
 • प्रत्येक पुस्तक खूप सोप्या पद्धतीने वाचणे शक्य
 • छापील पुस्तक तयार करणे शक्य 

काय आहे फायदा

 • मुलांना पुस्तक हातात घेऊन बसण्याची गरज नाही
 • देखभालीचा प्रश्न नाही
 • कधीही कुठेही ॲक्सेस
 • डिक्शनरी उपलब्ध असल्याने अर्थ शोधणे, लिंक शेअर करणे सोपे
 • पारंपरिक स्वरुपातील लायब्ररी देखभाल
 • भाडे व पुस्तक हरविल्यावर दंड भरण्याची भीती नाही

६ - अभ्यासिका
१६ - खासगी वाचनालये
१३ - सार्वजनिक वाचनालये
७२ - अनुदानित खासगी प्रा. शाळा 
२१ - विना अनुदानित
११७ - कायम विनाअनुदानित 
१७ - अनुदानित खासगी सीबीएसई
१३६ - प्राथमिक शाळा
१८ - माध्यमिक शाळा

Edited By - Prashant Patil

loading image