वडगाव नगर पंचायतीच्या मुख्याधिकारीपदी पानसरे 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 August 2020

राज्याच्या नगरविकास विभागाचे सचिव सचिन सहस्रबुद्धे यांनी या बाबतचा आदेश काढला आहे.

वडगाव मावळ (पुणे) : वडगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी कुही (जि. नागपूर) नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी सुचिता पानसरे-शिंगाडे यांची येथे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी पदभार स्वीकारला आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्याच्या नगरविकास विभागाचे सचिव सचिन सहस्रबुद्धे यांनी या बाबतचा आदेश काढला आहे. कोरोना संसर्ग नियंत्रणाचे गांभीर्य व निकड विचारात घेऊन त्याबाबतच्या उपाययोजनांचा भाग म्हणून हा आदेश काढल्याचे त्यात म्हटले आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी वडगाव नगर पंचायतीची स्थापना झाल्यानंतर मुख्याधिकारी म्हणून ओगले यांची नियुक्ती झाली होती. त्यांच्या जागी नियुक्त झालेल्या पानसरे यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सत्ताधारी महाविकास आघाडी व भाजप नगरसेवकांनी त्यांचे स्वागत केले. त्या यापूर्वी कुही (जि.नागपूर) नगर पंचायतीमध्ये दीड वर्षे तर त्यापूर्वी भिवापूर नगर पंचायतीत तीन वर्षे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होत्या. पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, रोगप्रसार नियंत्रण आदी कामांचा त्यांना अनुभव आहे. शिस्तप्रिय म्हणूनही त्यांची ओळख आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suchita pansare appointed as chief officer of vadgaon maval nagar panchayat