त्याचं विवाहितेवर प्रेम जडलं, पण तिनं नकार दिला अन् पतिला सांगितलं तर...

त्याचं विवाहितेवर प्रेम जडलं, पण तिनं नकार दिला अन् पतिला सांगितलं तर...

पिंपरी : दोघेही विवाहित असताना एका व्यक्तिचे विवाहितेवर प्रेम जडले. मात्र, हे प्रेम एकतर्फी होते. विवाहितेने नकार देत पतीला ही गोष्ट सांगितल्याने त्याने रागातून विवाहितेला संपविले. त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली. मात्र, या घटनेट विवाहितेच्या मृत्युमुळे तिची चिमुकली लेकरे पोरकी झाली; तर दुसऱ्या कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबाचा आधारच गेला. यामुळे एकतर्फी प्रेम दोन कुटुंब उध्वस्त होण्यास कारणीभूत ठरले. 

ही धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वीच पिंपरी-चिंचवडमधील चिखली येथे उघडकीस आली. अरविंद शेषराव गाडे (वय 34, रा. अशोका हाउसिंग सोसायटी, अजंठानगर) याचे त्याच्या घराशेजारीच राहणाऱ्या राणी सतीश लांडगे (वय 29, रा. गजरमल चाळ, अजंठानगर, चिंचवड) या विवाहितेवर एकतर्फी प्रेम होते. अरविंद हा राणी यांना फोन करून त्रास द्यायचा. या बाबत राणी यांच्या पतीने त्याला समजावून सांगितले होते. तसेच, अरविंद वारंवार फोन करीत असल्याने राणी यांनी मोबाईल क्रमांकही बदलला होता. राणी या नकार देत असल्याच्या रागातून अरविंदने त्यांचा चाकूने वार करून खून करीत स्वतःही आत्महत्या करून जीवन संपविले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, लांडगे दाम्पत्य चिखली परिसरात सुखी-समाधानाने राहत असताना कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासह मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी दोघेही धडपडत होते. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी मुलांचा सांभाळ करीत पतीसह राणी या देखील कामाला जायच्या. मात्र, या प्रसंगामुळे संपूर्ण कुटुंबच उध्वस्त झाले आहे. लेकरांवर मायेचा हात फिरविणारी आई या जगात नाही. याची पुरेशी समजदेखील त्या चिमुकल्यांना नाही. तर अरविंद याने रागाच्या भरात विवाहितेला मारून स्वत:चेही जीवन संपविले असले, तरी या घटनेमुळे त्याच्यामागे असलेले कुटुंब मात्र, उघड्यावर पडले आहे. त्याला दोन छोट्या मुली असून, कुटुंबातील कर्ता पुरुषच गेल्याने कुटुंबाचा आधार गेला आहे. दरम्यान, या घटनेमुळे दोन्ही कुटुंब अक्षरश: उघडी पडली आहेत. 

प्रेमाची संकल्पानच होतेय धूसर 

दोघांची मने जुळली तर त्याला प्रेम म्हणतात. एकतर्फी प्रेम असू शकत नाही, हे अद्यापही काही जण स्वीकारायला तयार होत नाहीत. अन्‌ यातूनच काही अघटीत घटना घडतात. अशा घटनांमुळे प्रेमाची संकल्पनाच धूसर होत असल्याचे दिसून येत आहे. 

...तर घटना टळली असती

अरविंद हा अनेक दिवसांपासून राणी यांना त्रास देता होता. या बाबत राणी यांनी त्यांच्या पतीला सांगितल्यानंतर त्यांनी अरविंदला समजावून सांगितले होते. मात्र, याचवेळी राणी यांच्या पतीने पोलिसांत तक्रार केली असती, तर अरविंदवर कायदेशीर कारवाई झाली असते. यामुळे कदाचित ही घटना टळली असती. 

...अशी घडली घटना 

राणी या चिखली, शिवतेजनगरमधील फेज क्रमांक 18, प्लॉट क्रमांक 568 येथील रस्त्याने शनिवारी (ता. 1) दुपारी एकच्या सुमारास कामावरून घरी पायी जात असताना अरविंदने त्यांना रस्त्यातच अडविले. त्यांच्यावर चाकूने सपासप वार केल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. त्यानंतर अरविंदने स्वत:वरही वार करून घेतले. यामध्ये तोदेखील जखमी झाला. उपचारासाठी दोघांनाही पिंपरीतील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, राणी यांना डॉक्‍टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले तर अरविंद याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com