Pimpri : ‘स्वच्छाग्रह’साठी रविवारी प्लॉगेथॉन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajesh Patil

‘स्वच्छाग्रह’साठी रविवारी प्लॉगेथॉन

पिंपरी : प्रत्येक घरापर्यंत ‘स्वच्छाग्रह’ उपक्रम पोहोचविण्यासाठी रविवारी (ता. २१) शहरात सकाळी सात ते दहा या वेळेत प्लॉगेथॉन मोहीम शहरात राबविण्यात येणार आहे. ती यशस्वी करण्यासाठी महापालिकेच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कुटुंबासह सहभागी होऊन नागरिकांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी केले.

प्लॉगेथॉन मोहिमेच्या नियोजनासाठी महापालिका मुख्य प्रशासकीय भवनात आयोजित बैठकीत आयुक्त पाटील बोलत होते. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, शहर अभियंता राजन पाटील, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, सहशहर अभियंता मकरंद निकम, श्रीकांत सवणे, रामदास तांबे, संजय कुलकर्णी, संदेश चव्हाण, अशोक भालकर, सतीश इंगळे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी जितेंद्र कोळंबे, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, उपआयुक्त सुभाष इंगळे, मनोज लोणकर, अजय चारठाणकर, संदीप खोत, आशा दुरगुडे, चंद्रकांत इंदलकर, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे आदी उपस्थित होते. माझी वसुंधरा जनजागृतीची शपथ घेतली. ‘माझी वसुंधरा’ व ‘स्वच्छ भारत अभियान’ या याबाबत संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली.

आयुक्त पाटील म्हणाले, ‘‘शहराला देशातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ व सुंदर शहर बनविण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. महापालिकेबद्दल जनमानसातील प्रतिमा उंचावण्यासाठी प्लॉगेथॉन मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यात लोकप्रतिनिधी, संस्था, मंडळे, संघटना, ज्येष्ठ नागरिक संघ, विद्यार्थी, बचत गट,

पर्यावरणप्रेमी आणि स्वच्छतेबद्दल जागृत व्यक्तींना सहभागी करून घ्यावे. आपला परिसर स्वच्छ असावा असे प्रत्येकाला वाटते, त्यासाठी सर्वांनी योगदान दिले पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने मोहिमेत सहभागी व्हावे.’’

प्लॉगेथॉन मोहिमेबाबत...

कधी? ; रविवार, ता. २१ नोव्हेंबर

कुठे? ; ३२ प्रभागांत ६४ ठिकाणी

काय? ; ‘स्वच्छाग्रह’ उपक्रमात लोकसहभाग

loading image
go to top