
पिंपरी : तळेगाव ते शिक्रापूर महामार्गाचे सर्वेक्षण दोन खासगी कंपन्यांनी सुरू केले आहे. पुढील सात दिवस हे सर्वेक्षण सुरू राहणार असून, वाहनचालकांकडून विविध माहिती गोळा केली जाणार आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) दिला जाणार आहे.