पिंपरी-चिंचवडमध्ये तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 February 2021

जनरल कॉम्बॅक्‍ट प्रिपेअर्डनेस कोर्स (जीसीपीसी) या प्रशिक्षणासाठी निवड झाल्यानंतरही पोलिस आयुक्‍तालयातील तीन पोलिसांनी प्रशिक्षणास जाण्यास टाळाटाळ केली.

पिंपरी : जनरल कॉम्बॅक्‍ट प्रिपेअर्डनेस कोर्स (जीसीपीसी) या प्रशिक्षणासाठी निवड झाल्यानंतरही पोलिस आयुक्‍तालयातील तीन पोलिसांनी प्रशिक्षणास जाण्यास टाळाटाळ केली. दरम्यान, प्रशिक्षणाला जाणे टाळण्यासाठी हे तिघेजण जाणीवपूर्वक रुग्णालयात दाखल झाल्याचे निदर्शनास आल्याने या तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विजय गायकवाड, श्रीकांत शिंदे, जुम्मा पठाण अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत. गायकवाड व शिंदे हे वाकड पोलिस ठाण्यात तर पठाण हे चिखली पोलिस ठाण्यात शिपाई पदावर कार्यरत आहेत. पुण्यातील रामटेकडी येथील राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक 1 येथे 4 ते 27 फेब्रुवारीदरम्यान होत असलेल्या जीसीपीसी कोर्स (फोर्स वन) या प्रशिक्षणासाठी या तिघांची निवड झाली होती. मात्र, त्यांनी वैद्यकीय कारणे देत प्रशिक्षणाला जाणे टाळले. 

पिंपरी-चिंचवडकरांनो, कोणाला लिफ्ट देण्याच्या विचारात असाल तर थांबा!

फोनवरून संपर्क केला असता फोन न उचलता पुन्हा प्रतिसादही दिला नाही. दरम्यान, महत्त्वाचे प्रशिक्षण असताना प्रशिक्षणाला जाणे टाळण्यासाठी जाणीवपूर्वक रुग्णालयात दाखल झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे परिमंडळ दोनचे उपायुक्त आनंद भोईटे यांनी या तिघांवर सोमवारी (ता.8) निलंबनाची कारवाई केली. 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suspension action against three police in pimpri chinchwad