Wakad News : थेरगावमध्ये घरात आढळला महिलेचा संशयास्पद मृतदेह

थेरगावमध्ये वनदेव आनंदवन नगर येथील एका घरात रविवारी (ता. १८) सायंकाळी विवाहितेचा संशयितरित्या मृतदेह आढळून आला.
Megha Jurande
Megha Jurandesakal

वाकड - थेरगावमध्ये वनदेव आनंदवन नगर येथील एका घरात रविवारी (ता. १८) सायंकाळी विवाहितेचा संशयितरित्या मृतदेह आढळून आला आहे. मेघा लखन जुरांडे (वय २८, सध्या रा. वनदेव आंनदवन नगर, थेरगाव, मुळगाव जवळा जामखेड नगर) असे त्या महिलेचे नाव असून मृतदेहाच्या मांडीवर खोलवर चटके दिल्याच्या खुणा आढळून आल्याने या प्रकरणाबाबत तर्क-वितर्क सुरु आहेत.

अद्याप तरी वाकड पोलिसांकडे आकस्मिक मृत्यूची नोंद कारण्यात आली आहे. मेघा यांनी नऊ वर्षांपूर्वी अंतरजातीय प्रेम विवाह केला होता त्यांना पाच वर्षांचा एक मुलगा असून त्यांचे पती वाहन चालक आहेत. मात्र, मेघा यांचा मृत्यू नेमका कशाने झाला की तो घातपात आहे याबाबत वाकड पोलीस तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com