महत्त्वाची बातमी : 'वायसीएम'मध्ये उद्यापासून स्वॅब टेस्टींग लॅब सुरू होणार 

महत्त्वाची बातमी : 'वायसीएम'मध्ये उद्यापासून स्वॅब टेस्टींग लॅब सुरू होणार 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी व कोरोना संशयितांच्या स्वॅबची लवकर तपासणी व्हावी, यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे उद्यापासून एक लाख ऍन्टिजेन किट उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे वायसीएममध्येच रुग्णांचे स्वॅब तपासण्याची सोय होणार आहे. रोज 376 स्वॅब तपासणी इतकी वायसीएम लॅबची क्षमता आहे. 

कोरोनाची लक्षणे असणारे तसेच, कोरोबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची सध्या स्वॅबद्वारे चाचणी होते. परंतु, आता या किटचा वापर करून अशा व्यक्तींची रॅपिड ऍन्टिजेन किटच्या सहाय्याने प्रथम चाचणी करण्यात येणार आहे. अवघ्या पंचवीस ते तीस मिनिटात या संशयितांना कोरोनाची लागण झालेली आहे, की नाही याची माहिती मिळणार असून कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अशा संशयितांची स्वॅबद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. या ऍन्टिजेन किटमुळे स्वॅबद्वारे होणारी चाचणी त्यासाठी लागणारा वेळ, येणारा खर्च वाचणार असून, कोरोना प्रसार रोखण्यास मदत होणार आहे. प्रामुख्याने या किटचा वापर कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या को-मॉरबिड व्यक्ती, गरोदर महिला, फ्रंटलाईन कर्मचारी व कन्टेनमेंट झोनमधील व्यक्ती यांचेसाठी करण्यात येणार आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयास स्वॅब टेस्टींग लॅबकरीता आयसीएमआरची मान्यता मिळालेली आहे. उद्यापासून या ठिकाणी स्वॅब टेस्टींग सुरू होणार आहे. यामुळे संशयित कोरोना रुग्णांचा तपासणी अहवाल प्रलंबित न राहता जलद गतीने प्राप्त होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती महापौर उषा ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, "दाट लोकवस्तीत सर्वाधिक रुग्ण आहेत. सध्या 12 हॉटस्पॉट आहेत. अधिक प्रसार होऊ नये, यासाठी तपासणीचे प्रमाण वाढविलेले आहे. त्यासाठी खासगी लॅबची मदत घेतली आहे. वायसीएमची लॅबही सुरू होणार आहे. सध्या दररोज सरासरी 650 स्वॅबची तपासणी केली जात आहे. सध्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही), राष्ट्रीय एडस्‌ नियंत्रण व संशोधन संस्था (नारी), बीजे मेडिकल कॉलेज यांच्यासह आयसर, बिर्ला हॉस्पिटल, क्रष्णा डायग्नोस्टिक, वायरोप्ले, एसजी डायग्नोस्टिक, मेट्रोपोलिटीन डायग्नोस्टिक, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल या खासगी लॅबचीही मदत घेतली जात आहे. वायसीएम लॅबची क्षमता दिवसाला 376 स्वॅब तपासणी इतकी असेल.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com